तंबाखूला नकार देऊया, आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडवूया - डॉ. दीपक सावंत - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

30 May 2017

तंबाखूला नकार देऊया, आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडवूया - डॉ. दीपक सावंत


मुंबई, दि. 30 : कर्करोगासह अनेक दुर्धर आजारांना कारणीभूत असलेल्या तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांना आयुष्यात स्थान देवू नका, असे आवाहन आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनानिमित्त केले. ३१ मे रोजी ‘जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन’ साजरा केला जाणार आहे, त्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांनी राज्यातील नागरिकांना आवाहन केले आहे. तंबाखूचा विळखा हा प्रगतीला धोका असल्याचे सांगत जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिनी तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांना नकार देण्याची शपध घेऊन आरोग्यदायी महाराष्ट्र निर्माण करूया असे त्यांनी यावेळी संगितले.


आरोग्यमंत्री म्हणाले की, तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाने कर्करोग, पक्षाघात, फुप्फुसाचे आजार, टीबी, श्वसनसंस्थेचे विकार होतात. दरवर्षी जगभरात तंबाखुमुळे ६० लाख लोकांचा मृत्यू होतो आहे. जनतेचे प्रबोधन करून त्यांना तंबाखूपासून परावृत करण्यासाठी ३१ मे हा जागतिक तंबाखू सेवन विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो. तंबाखूचे सेवन मानवी जीवनाला मोठा धोका असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने जाहीर केले आहे. Threat to development, say no to tobacco हे या वर्षीचे जागतिक आरोग्य संघटनेचे ब्रिदवाक्य आहे.

आरोग्य विभागाच्या वतीने वर्षभर विविध माध्यमाद्वारे तंबाखूच्या दुष्परिणामाबाबत जनजागृती सुरू असते शाळांच्या 100 यार्ड आवारात तंबाखूच्या पदार्थांची विक्री बंदी, सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास बंदी, तंबाखूजन्य पदार्थ विक्री, जाहिरात करणे, तंबाखू विरोधी कायद्यातील नियमांची काटेकोर अंमलबाजवणी होणे आवश्यक असून आरोग्य विभाग, अन्न औषधे, पोलिस व इतर शासनाच्या विविध घटकांनी संघटितपणे तंबाखूच्या उच्चाटन करण्याची गरज असल्याचे मत दीपक सावंत यांनी व्यक्त केले.

Post Bottom Ad