मोदींच्या फोटोसाठी कुणी परवानगी मागितली, माहिती नाही - पंतप्रधान कार्यालय - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

मोदींच्या फोटोसाठी कुणी परवानगी मागितली, माहिती नाही - पंतप्रधान कार्यालय

Share This
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींचे छायाचित्र जाहिरातीत वापरण्याची परवानगी कुणी कुणी मागितली, याची माहिती उघड करणे शक्य नसल्याचे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे. या माहितीसाठी सखोल शोध घेण्याची गरज असल्याचे कारण पंतप्रधान कार्यालयाने दिले आहे.ही माहिती संकलितपणे उपलब्ध नसल्याने तिचा शोध घेण्यासाठी पंतप्रधान कार्यालयातील संसाधने असमान पद्धतीने वळवावे लागतील, असे 'पीएमओ'ने आरटीआयला दिलेल्या उत्तरात म्हटले आहे.


'पीटीआय'च्या एका प्रतिनिधीने यासंदर्भात आरटीआय अर्ज दाखल करून माहिती मागविली होती. यासंबंधीची माहिती संकलित करण्यासाठी सखोल शोध घेण्याची गरज असल्याचे 'पीएमओ'ने म्हटले आहे. यासाठी 'पीएमओ'ची संसाधने असमान पद्धतीने वळवावे लागतील आणि हे आरटीआय कायद्यातील कलम ७(९) ला अनुसरून नसल्याचे यात म्हटले. दुसर्‍या एका प्रश्नाला उत्तर देताना रिलायन्स जिओ आणि पेटीएमने पंतप्रधानांचे छायाचित्र जाहिरातीत वापरण्यासाठी परवानगी मागितल्याची नोंद नसल्याचे पीएमओने म्हटले आहे. मागविण्यात आलेली माहिती पंतप्रधान कार्यालयाकडील नोंदींचा भाग नसल्याचे उत्तर देण्यात आले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages