सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीपासून डावलल्याने शिक्षिकेचे आझाद मैदानात उपोषण - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

08 May 2017

सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीपासून डावलल्याने शिक्षिकेचे आझाद मैदानात उपोषण


धुळे येथील जयहिंद हायस्कुलच्या उप शिक्षिका पुष्पा अशोक पाटील यांना सेवाजेष्ठतेनुसार पदोन्नतीपासून डावलण्यात आले आहे. याबाबत शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद धुळे येथे न्याय मागूनही त्यांना न्याय मिळालेला नाही. आपल्याला न्याय मिळावा म्हणून त्यांनी जिल्हा परिषदे समोर आंदोलन केले आता या आंदोलनाचा भाग म्हणून मुंबईच्या आझाद मैदानात ८ मे २०१७ पासून आपल्या कुटुंबासह उपोषण सुरु केले आहे. मुख्यमंत्री किंवा शिक्षणमंत्री जो पर्यंत न्याय देत नाहीत तो पर्यंत उपोषण सुरु ठेवणार असल्याचे पुष्पा पाटील यांनी सांगितले.  

Post Bottom Ad