नवी दिल्ली : स्वच्छता अभियानाचा विस्तार करताना रेल्वे मंत्रालय प्रथमच एका स्वतंत्र संस्थेद्वारे रेल्वे मार्गावरील रुळांच्या स्वच्छतेबाबत सर्वेक्षण करणार आहे. या सर्वेक्षणाच्या आधारावर देशभरातील आपल्या १६ विभागांचे काम पाहून त्यांना रेल्वे मंत्रालयाकडून रँकिंग दिली जाणार आहे.
स्वच्छता अभियानानुसार सरकारकडून रेल्वे रूळ स्वच्छ ठेवण्यासाठी व्यापक पातळीवर प्रय▪केले जात आहेत, अशी माहिती रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकार्याने दिली. अनेक ठिकाणांवर रेल्वेचे रूळ हे कचर्याच्या ढिगार्यासारखे दिसतात. अशा ठिकाणी प्लास्टिकच्या बाटल्या, डबे पडलेले दिसतात. तसेच रेल्वेमधून पडणारे प्रवाशांचे मलमूत्र चिंतेचा विषय आहे. यामुळे रुळांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान होत आहे, असे अधिकार्याने म्हटले. या पार्श्वभूमीवर काही रेल्वे उपविभागांनी रेल्वेस्थानकाजवळ स्वच्छतेसाठी यंत्रआधारित प्रणालीचा वापर सुरू केला आहे. याशिवाय प्रवाशांचे मलमूत्र रुळांवर पडू नये, यासाठी अनेक रेल्वेंमध्ये 'बायो-टॉयलेट' बसविण्यात आले आहेत. रेल्वेने नुकतेच भारतीय गुणवत्ता परिषदेकडून ४0७ रेल्वेस्थानकांवर करण्यात आलेल्या स्वच्छतेसंदर्भातील सर्वेक्षण जारी केले होते.
२ ऑक्टोबर २0१४ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले होते. याच वेळी रेल्वेनेदेखील 'स्वच्छ रेल्वे, स्वच्छ भारत' अभियान जारी केले होते. व्यापक पातळीवर सुरू असलेल्या स्वच्छ भारत अभियानाद्वारे २0१९ पर्यंत स्वच्छ भारताचे लक्ष्य निर्धारित करण्यात आले आहे. २ ऑक्टोबर २0१९ रोजी सार्जया केल्या जाणार्या महात्मा गांधी यांच्या १५0 व्या जयंतीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ भारताचे स्वप्न साकार करण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या डोळय़ासमोर ठेवले आहे.