
दादर रानडे रोड समोरील अशोक वृक्ष पथ येथे शिवसेना शाखा क्रमांक १९२ च्या लोकप्रिय नगरसेविका प्रिती प्रकाश पाटणकर यांचा अभिनव उपक्रम शेतकऱ्यांचा माल थेट ग्राहकापर्यंत या कार्यक्रमाचे उदघाटन शिवसेना नेते डॉ. मनोहर जोशी व माजी महापालिका सभागृह नेत्या तृष्णा विश्वासराव यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाची संकल्पना मांडणारे माजी नगरसेवक प्रकाश पाटणकर, शाखाप्रमुख यशवंत विचले, शेखर भगत, शैलेश माळी, उमेश महाले, महिला उपविभागसंघटक वृषाली पेडणेकर, महिला शाखासंघटक रीमा पारकर, विभागातील महीला व पुरूष पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
