मुंबई - महापालिका आयुक्त अजोय मेहता यांच्या मार्गदर्शनात महापालिका मुख्यालयातील आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात महापालिका अधिका-यांची मासिक आढावा बैठक आज आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला अतिरिक्त आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय. ए. कुंदन अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आबासाहेब ज-हाड यांच्यासह महापालिकेचे परिमंडळीय उपायुक्त व उपायुक्त (महापालिका आयुक्त) रमेश पवार उपस्थित होते. या बैठकीमध्ये विविध उपयोगितांसाठी चर (Trenches) खोदण्याच्या परवानगीबाबत निर्णय घेण्यात आले वा आदेश देण्यात आले.
दुरध्वनी, विद्युत सुविधा, पाईपलाईन गॅस यासारख्या विविध २० बाह्य उपयोगितांसाठी (External Utilities) आवश्यकतेनुसार रस्त्यांवर चर (Trenches)खोदले जात असतात. हे चर खोदण्यासाठी विहीत शुल्क भरुन महापालिकेची परवानगी घेणे बंधनकारक आहे. यावर्षीपासून या परवानग्या केवळ ऑनलाईन पद्धतीने देण्यात येणार आहेत.
१ ऑक्टोबर २०१७ ते १५ मे २०१८ या कालावधी दरम्यान उपयोगितांशी संबंधित ज्या संस्थांना त्यांच्या आवश्यकतेनुसार रस्त्यावर चर खोदण्याची परवानगी हवी असेल,त्यांनी त्यांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने १५ सप्टेंबर २०१७ पर्यंत सादर करणे आवश्यक आहे. १५ सप्टेंबर नंतर म्हणजेच १६ सप्टेंबर ते ३१ ऑक्टोंबर २०१७ पर्यंत अर्ज सादर करणा-यांना नियमित शुल्काव्यतिरिक्त ७ टक्के अतिरिक्त शुल्क (विलंब शुल्क) जमा करणे बंधनकारक असेल. तर त्यानंतर अर्ज सादर करणा-यांना १५ टक्के अतिरिक्त शुल्क जमा करणे बंधनकारक आहे.
रस्त्यांवर उपयोगितांसाठी चर खोदण्याच्या कामांमध्ये सुसूत्रता यावी व एकाच रस्त्यावर वारंवार चर खोदले जाऊन नागरिकांना असुविधा होऊ नये यादृष्टीकोनातून चर खोदण्याच्या कामांचे सुसूत्रीकरण व समन्वयन करण्यात येत आहे. यामध्ये प्रामुख्याने सर्व चर खोदण्याच्या परवानग्या यापुढे केवळ ऑनलाईन पद्धतीनेच देण्यात येतील. तसेच या परवानग्यांची प्रत बाह्य उपयोगितांशी संबंधित असणा-या सर्व २० संस्थांना; तसेच महापालिकेशी संबंधित ४ खात्यांना व सर्व २४ प्रशासकीय विभागांनाही पाठविली जाईल.
यामुळे विभागस्तरावर चर खोदण्याची परवानगी देताना सुसमन्वयाने परवानगी देणे शक्य होणार आहे. तसेच एखाद्या रस्त्यावर एकापेक्षा जास्त संस्थांद्वारे चर खोदले जाणार असतील, तर अशा परिस्थितीत परवानगी देताना ते लागोपाठ पद्धतीने खोदले जातील, अशा रितीने परवानगी दिली जाईल. ज्यामुळे संबंधित कामे 'एका पाठोपाठ एक' व अधिक वेगाने करणे शक्य होऊन, नागरिकांना होणारी असुविधा कमी होण्यास मदत होईल.
याशिवाय चर खोदतांना रस्त्यावरील संबंधित ठिकाणी संरक्षक जाळ्या (Barricades)लावणे या संरक्षक जाळ्यांवर संबंधित संस्थेचे नाव, संपर्क क्रमांक, काम सुरु व संपण्याचा कालावधी याबाबतचा तपशील नमूद करणेही बंधनकारक आहे. याबाबतचे आदेश यापूर्वीच संबंधितांना देण्यात आले आहेत.
पदपथ दुरुस्ती कार्यक्रम -रस्ते व वाहतूक विभागाच्या प्रमुख अभियंत्यांनी पदपथांच्या दुरुस्ती कामांबाबत मार्गदर्शक तत्त्वे तयार करुन ती तातडीने परिपत्रक स्वरुपात सर्व २४ विभाग कार्यालयांच्या सहाय्यक आयुक्तांना पाठवावयाची आहेत.
सदर मार्गदर्शक तत्त्वांनुसार सर्व सहाय्यक आयुक्तांनी आपआपल्या क्षेत्रातील पदपथांचा आढावा घेऊन ज्या पदपथांची दुरुस्ती कामे करावयाची आहेत, त्याबाबतची यादी व कृती आराखडा १ जुलै २०१७ पर्यंत तयार करावयाचा आहे. सदर कृती आराखड्यानुसारच अनुषंगीक कामे ही विभागस्तरावर करावयाची आहेत.
पदपथांच्या दुरुस्तीची कामे ही १ ऑक्टोंबर २०१७ पासून हाती घ्यावयाची आहेत.