मुंबई / प्रतिनिधी - मुंबई महानगरपालिकेने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे कारण देत तानसा पाईप लाईन वरील झोपड्या तोडल्या आहेत. मात्र या तोडलेल्या झोपड्यांचे डेब्रिज महापालिकेने उचलले नसल्याने घाटकोपर पश्चिम येथील घरांचे नुकसान झाल्याचे समोर आले आहे.
मुंबई महानगर पालिकेने १७ मे रोजी घाटकोपर पश्चिम येथील वॉर्ड नंबर १२७ मधील कातोडी पाडा येथील आंबेडकर नगर रामनगर येथील बंद असलेल्या डाक लाईन वरील झोपड्या या तानसा पाईप लाईन वरील झोपड्या असल्याचे सांगत तोडल्या. १७ मे रोजी झोपड्या तोडण्यात आल्या असल्या तरी गेल्या २३ दिवसात या तोडलेल्या झोपड्यांचे रॅबिट मात्र पालिकेने उचललेले नाही. सदर विभाग हा डोंगराळ असल्याने पावसाचे सर्व पाणी डोग्रावरून मिळेल त्या मार्गाने खाली येथे. यामुळे या ठिकाणी संरक्षण भिंती बांधण्यात आल्या आहेत. घाटकोपरमध्ये गेले दोन - तीन दिवस सतत रात्रीचा पाऊस पडत आहे. दोन दिवस पाऊस पडत असताना याठिकाणी पालिकेने पाडलेल्या झोपड्यांचे रॅबिट पाण्याबरोबर सतत खाली येऊन संरक्षण भिंती जवळ येऊन अडकले होते. शुक्रवारी रात्री १२ वाजता पावसाचे पाणी डोंगरावरून खाली येताना रॅबिटसह रामनगर येथील अष्टविनायक सोसायटी जवळील संरक्षण भीत तोडून खाली असलेल्या घरांवर कोसळले. यात ८ घरांमध्ये पाणी घुसले त्यात घाणीच्या पान्यामंउळे ४ घरांमधील वस्तूंचे नुकसान झाले असून एका घराला तडा गेला आहे. हा विभाग वॉर्ड क्रमांक १२३ व १२७ च्या मधोमध असल्याने याविभागात सफाईकाम व रॅबिट उचलण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे असा आरोप स्थानिक रहिवाश्यांनी केला आहे.