राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘बळीराजाची सनद’ सरकारला सादर - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

10 June 2017

राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने ‘बळीराजाची सनद’ सरकारला सादर


मुंबई, दि.१० जून २०१७ - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर करण्यात आलेली शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची ‘बळीराजाची सनद’ आज खा.सुप्रिया सुळे व मुंबई विभागीय अध्यक्ष सचिन अहिर यांच्या नेतृत्वाखालील शिष्ठमंडळाने राज्य सरकारला निवदेनाव्दारे दिली.

राज्याच्या मुख्य सचिवांच्या वतीने ही सनद कृषी विभागाचे प्रधान सचिव विजयकुमार यांनी स्विकारली. यावेळी राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा चित्राताई वाघ, मुंबई महिला अध्यक्षा सुरेखाताई पेडणेकर, आ.हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी आ.अशोक धात्रक, प्रदेश चिटणीस संजय बोरगे, मुंबई युवती अध्यक्षा आदिती नलावडे, प्रदेश प्रवक्ते क्लाईड क्रास्टो, संजय तटकरे आदी नेते उपस्थित होते. तत्पुर्वी राष्ट्रवादी भवन येथे ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर मंत्रालया शेजारील महात्मा गांधीजीच्या तसेच भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास पुष्पचक्र वाहून अभिवादन करण्यात आले.

यावेळी बोलताना खा.सुप्रियाताई सुळे म्हणाल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा यंदाचा वर्धापन दिन हा ‘बळीराजाला समर्पित’ करण्यात आला आहे. संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांप्रती आमच्या पक्षाची पूर्णपणे बांधीलकी आहे. आज राज्यातील शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांची बळीराजाची सनद राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून जाहीर करण्यात आली असून ही सनद आम्ही निवदेनाव्दारे सरकारला देत आहोत. गेल्या ३-४ महिन्यात सबंध राज्यात संघर्ष यात्रेच्या माध्यमातून या विषयाकडे आम्ही शेतकरी, शेतमजूर, आणि राज्यातील जनतेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष वेधले आहे. राज्यात कर्जबाजारीपणा आणि नापिकीमुळे

शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण मोठया प्रमाणात वाढलेले असतांनाही सत्तेत असलेले सरकार मात्र आम्ही योग्य वेळ येण्याची वाट पाहत आहोत असे सांगत आहे. आज शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचा सात बारा पुर्णपणे कोऱा करण्याची गरज आहे. परंतु सरकार शेतकऱ्यांच्या मागण्यांबाबत गंभीर नसल्याचे दिसत आहे. राज्याचे मुख्यमंत्री विरोधकांच्या व शेतकरी आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांच्या कुंडल्या आपल्या हातात असल्याचे सांगत आहेत. मुख्यमंत्र्यांना जर शेतकऱ्यांना संपुर्ण कर्जमाफी देता येत नसेल तर त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन ज्योतिषशास्त्राचा पुर्णवेळ अभ्यास करावा असा उपरोधिक टोलाही यावेळी खा.सुप्रिया सुळे यांनी मुख्यमंत्र्यांना लगावला.

Post Bottom Ad