मुंबई दि. १८ (प्रतिनिधी) दिंडोशीविधानसभेत शिवसेनेचा वर्धापनदिन नेहमीच आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. या वर्षी शिवसेनेचा ५१ वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असून आज दि १८ जून रोजी महापालिका शाळा, पारेख नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. सकाळपासूनच शिबिराला रक्तदात्यांची रीघ लागली होती.
८० टक्के समाजकारण व २० टक्के राजकारण करण्याची शिकवण तमाम शिवसैनिकांना शिवसेनाप्रमुखांनी दिली होती. तीच शिकवण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नेटाने चालवत आहेत. मुंबईत रक्ताची आणि प्लेटलेट्सची तीव्र टंचाई भासत आहे त्यामुळे सामाजिक बांधिलकी या नात्याने दिंडोशी विधानसभा मतदार संघात आज रविवार १८ जून रोजी सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत मालाड पूर्व कुरारगाव येथील पारेखनगर येथील महापालिका शाळेत भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते खासदार गजानन कीर्तिकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडोशीत शिवसेनेचा ५१ वर्धापनदिन साजरा करण्यात येणार असून या भव्य रक्तदान शिबीराचे उद्घाटन महिला विभागसंघटक व नगरसेविका साधना माने यांच्या हस्ते झाले. या सामाजिक कर्तव्याच्या जाणीवेतून दिंडोशीतील नागरिकांनी या रक्तदान शिबिरात मोठ्या संखेने सहभागी होण्याचे आवाहन आमदार प्रभू यांनी केले होते आणि या आवाहनाला उस्फुर्त प्रतिसाद देत रक्तदाते मोठ्या संख्येने आले व त्यांनी रक्तदान केले. या सर्व रक्तदात्यांचे आमदार सुनिल प्रभु यांनी आभार मानले.
महिलांसाठी मोफत योगा मार्गदर्शन शिबीर -
दिंडोशी विधानसभा महिला आघाडीच्या वतीने रविवार २५ जून रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत कुरारगाव पारेखनगर येथील महापालिका शाळेत महिलांसाठी मोफत योगा मार्गदर्शन शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. घराचा डोलारा यशस्वी पणे सांभाळणाऱ्या दिंडोशीतील तमाम महिला वर्गाचे आरोग्य चांगले राहण्यासाठी या शिबीराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती आमदार प्रभू यांनी दिली. तसेच रविवार २५ जून रोजी सायंकाळी ७ ते ९ आमदार सुनील प्रभू यांच्या कुरार येथील जनसंपर्क कार्यालयात विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना व विधवा निवृत्ती वेतन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना व जेष्ठ नागरिक कार्ड अशा विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे. दिंडोशीतील महिलांनी या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आपल्या विविध शिवसेना शाखांशी संपर्क साधावा असे आवाहन आमदार प्रभू यांनी केले आहे.
दिंडोशीत शिवसेनेचा ५१ वर्धापनदिन यशस्वीपणे साजरा करण्यासाठी आयोजक आमदार प्रभू यांच्या मार्गदर्शनाखाली महिला विभागसंघटक साधना माने यांच्यासह उपविभागप्रमुख विष्णू सावंत, विधी समिती अध्यक्ष सुहास वाडकर, महिला विधानसभा संघटक अनघा साळकर, महिला उपविभाग संघटक रिना सुर्वे व पूजा चौहान, युवासेना सरचिटणीस अमोल कीर्तिकर व निरीक्षक अंकित प्रभू, स्थापत्य समिती अध्यक्ष (उपनगरे) तुळशीराम शिंदे, माजी नगरसेवक चंद्रकांत वाडकर, गणपत वरिसे, सदाशिव पाटील, प्रियवंदा कदम, माजी आरोग्य समिती अध्यक्ष प्रशांत कदम, माजी नगरसेवक सुनील गुजर, मनीषा पाटील, सायली वरिसे, युवासेना विभाग अधिकारी रुपेश कदम, भाविसे विभाग ३ निमंत्रक विजय गावडे, भाविसे विभाग संघटक प्रशांत मानकर यांच्यासह दिंडोशीतील शाखाप्रमुख महिला शाखासंघटक, युवासेना व विद्यार्थीसेना तसेच सर्व शिवसैनिक भरपूर मेहनत घेत आहेत.
दिंडोशीतील विद्यार्थ्यांचा HI-TECH कौतुक सोहळा -
तसेच आज दिंडोशीतील १० वी मध्ये गुणवंत झालेल्या विद्यार्थ्यांचा HI-TECH कौतुक सोहळा युवासेने मार्फत करण्यात आला. दिंडोशी विभागातील प्रथम तीन येणाऱ्या विद्यार्थ्यांना लॅपटॉप, टॅब आणि सॅमसंग मोबाईल देऊन गौरविण्यात आले तसेच दिंडोशी विभागातील शालेय महाविद्यालयातील प्रथम १० आलेल्या अशा ५०० विद्यार्थ्यांना कॉलेज (SAG) बॅग देऊन गौरविण्यात आले. तसेच नवशा टेकडी, वायशेतपाडा क्र. २, कुरार येथील आमदार सुनिल प्रभु यांच्या आमदार निधीमधून नुतनीकरण केलेल्या अंबा-माता मंदिराचे लोकार्पण देखील आज आमदार सुनिल प्रभु यांच्या हस्ते झाले.