मुंबई, दि. 7 : अकोला येथे पोलिसांसाठी 360 निवासस्थाने बांधण्यासंदर्भातील सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आले असून लवकरच पोलिसांना हक्काचे निवासस्थान मिळणार आहे. या संदर्भात निविदा प्रक्रिया एका महिन्यात पूर्ण करून पुढील कार्यवाहीस तत्काळ सुरुवात करावी,असे निर्देश गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी दिले आहेत.
अकोला निवासस्थानेसंदर्भात आज मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळीडॉ. पाटील बोलत होते. बैठकीस पोलीस गृहनिर्माण व कल्याण मंडळाचे महासंचालक दिपक पांडे, सुप्रिटेंडंट इंजिनिअर अरूण कुमार खोत, अकोला महापालिका आयुक्त अजय लहाणे आदिंसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
डॉ. पाटील म्हणाले की, अकोला पोलिसांना लवकरच हक्काचे निवासस्थान देण्यासंदर्भातील कार्यवाही पुर्णत्वास आली असून, निविदा काढण्याची प्रक्रिया एका महिन्यात करण्यात यावी. तयार आराखड्यानुसार पुढील प्रक्रिया करण्यात यावी. यामुळे अकोला पोलिसांना लवकरच त्यांच्या हक्काचे निवासस्थान मिळणार आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.