रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारी व्हाट्सअपवर करा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

रस्त्यावरील खड्ड्यांच्या तक्रारी व्हाट्सअपवर करा

Share This

मुंबई / प्रतिनिधी -- पावसाळयात मुंबईतील रस्त्यांवर दरवर्षी खड्डे पडतात. या खड्ड्यांवरून सतत टिका होत आली आहे. खड्ड्यांवरून होणाऱ्या टिकेमुळे महापालिकेचे सातत्याने वाभाडे निघत असल्याने महापालिकेने पावसाळ्यातून रस्त्यावर पडणा-य़ा खड्ड्य़ांची तक्रार व्हाट्सअपवर करण्यासाठी वॉर्ड निहाय अधिकाऱ्यांचे नंबर जाहीर केले आहेत.

मुंबई महानगर पालिकेने रस्त्यावरील खड्डयांची माहिती देण्यासाठी वेबसाईट व एप्सचा वापर केला आहे. वेबसाईट व एप्सला मुंबईकर नागरिकांचा भरघोस प्रतिसाद मिळत असल्याने आणि रस्त्यावरील नेमके खड्डे किती याची नेमकी आकडेवारी किती याची माहिती वेबसाईटवर जगजाहीर होत असल्याने पालिकेने वेबसाईट व एप्सचा वापर बंद केला आहे. मागील वर्षपासून वॉर्डमधील अधिकाऱ्यांचे मोबाईल नंबर देऊन थेट अधिकाऱ्यांना खड्ड्यांची माहिती व्हाट्सअपवर देण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.

महापालिकेने मागील वर्षी वॉर्ड निहाय अधिकाऱ्यांचे नंबर जाहीर केले होते यावेळी अधिकाऱ्यांनी आमचे खाजगी नंबर जाहीर का केले यावरून वॉर्ड मधील अधिकाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर यावर्षी मुंबई महापालिकेने पुन्हा अधिकाऱ्यांचे व्हाट्सअप नंबर जाहीर केले आहेत. रस्त्यावर खड्डे असल्यास संबंधित वॉर्डमधील अधिकाऱ्यांच्या व्हाट्सअप नंबरवर खड्ड्यांचा फोटो काढून पाठवता येणार आहेत. यामुळे त्या भागातील केलेल्या तक्रारीची दखल अधिका-यांना घेणे सोपे जाणार असल्याचे पालिकेचे म्हणणे आहे.

पावसांत रस्त्यांवर पडणा-य़ा खड्ड्यांमुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. वाहतुकीचा खोळंबा होतो. खड्यांत पाणी साचून साथीच्या आजारांशी सामना करावा लागतो. रस्त्यांची स्थिती समाधानकारक नसल्याचे चित्र आहे. पावसांत रस्त्यावर खड्डे पडल्यास नागरिकांना तात्काळ व्हाट्सअपवर तक्रार करता येणार आहे. या तक्रारीची दखल त्या विभागातील अधिका-यांना तात्काऴ घेण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत.

मुंबईमधील रस्त्यांची स्थिती -
मुंबईमधील 241 किमी रस्त्यांची दुरुस्ती करून त्यावर पावसांत खड्डे प़डणार नाही, असा दावा महापालिकेने केला आहे. अत्यंत खराब स्थितीत असलेल्या 110 रस्त्यांच्या दुरुस्तीचे काम मान्सूनपूर्वी पूर्ण करण्यात आले आहे. 168 रस्त्यांची कामे सुरू आहेत, मात्र ही कामे पावसानंतर पूर्ण करता येणार आहेत. शिवाय 415 रस्त्यांचे सिमेंट काँक्रीट किंवा, डांबरीकरण केली जाणार होती. मात्र त्यातील 323 रस्त्यांची कामेच पूर्ण झाली आहेत. यांतील 92 कामे पावसानंतर पूर्ण करता येणार आहेत.

तक्रारीसाठी वॉर्डनिहाय मोबाईल नंबर-
वॉर्ड -                       मोबाईल नंबर
ए                             8879657698
बी                            8879657724
सी                           8879657704
डी                            8879657694
ई                             8879657712
एफ-उत्तर                 8879657717
एफ- दक्षिण               8879657678
जी- उत्तर                  8879657683
जी - दक्षिण                8879657693
एच - पूर्व                   8879657671
एच - पश्चिम             8879657633
के -पूर्व                      8879657651
के - पश्चिम               8879657649
पी - दक्षिण                8879657661
पी - उत्तर                 8879657654
आर - दक्षिण              8879657656
आर - उत्तर               8879657636
आर - मध्य               8879657634
एल-                         8879657622 / 8879657610
एम पूर्व-                    8879657612
एम पश्चिम-              8879657608 / 8879657614
एन-                          8879657617 / 8879657615
एस-                          8879657603 / 8879657605
टी-                            8879657609 / 8879657611

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages