मुंबई १२ जून २०१७ - मुंबई शहराला पर्यटनाच्या दृष्टीने अधिकाधिक चालना देण्यासाठी छत्तीस सदस्यीय विशेष समिती स्थापन करण्याची तसेच महापालिकेच्या विद्यमान विशेष समित्यांच्या कामकाजाच्या धर्तीवर या समितीचे कामकाज करण्यात यावे अशी मागणी समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख यांनी महापौरांकडे पत्राद्वारे केली आहे.
मुंबई शहर हे भारताच्या व जगाच्या नकाशावरील एक महत्वपूर्ण शहर आहे . भारताची आर्थिक राजधानी असंलेल्या ह्या शहराचे शैक्षणिक , सांस्कृतिक , सामाजिक महत्वही तेव्हढेच मोठे आहे. . या शहराला तिन्ही बाजूनी समुद्राने वेढलेले असल्याने सुंदर किनारे व चौपाट्या लाभलेल्या आहेत. गौथिक शैलीतील अनेक भव्य व वैशिष्ठपूर्ण इमारती हे ह्या शहराचे आणखीन एक भूषण आहे. हे शहर एक महत्वपूर्ण पर्यटन स्थळ असल्याने ह्या महानगराला देश विदेशातील पर्यटक मोठ्या प्रमाणात भेटी देत असतात.
त्यामुळे पर्यटनाच्या दृष्टीने मुंबई शहराची रचना अधिकाधिक आकर्षक करून अधिकाधिक पर्यटकांनी ह्या शहरास भेट द्यावी म्हणून ह्या शहराचा विकास व परिरक्षण वाढण्याकरिता छत्तीस सदस्यीय विशेष समिती नेमण्यात यावी अशी मागणी रईस शेख यांनी केली. मागणीही त्यांनी केली .