स्वाईन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांची मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना भेट - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

28 June 2017

स्वाईन फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्र्यांची मुंबई महापालिकेच्या रुग्णालयांना भेट


मुंबई - स्वाईन फ्ल्यूवर नियंत्रण मिळविण्यासाठी लोकांमध्ये या आजाराबाबत अधिकाधिक जनजागृती होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज येथे केले. 

मुंबईत स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण वाढल्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी मुंबईतील कस्तुरबा संसर्गजन्य आजार रुग्णालयाला भेट दिली. शहरातील स्वाईन फ्ल्यूच्या परिस्थितीचा आढावा घेवून रुग्णांची विचारपूस केली. या आढावा बैठकीस दिल्ली येथून आलेल्या शीघ्र प्रतिसाद पथकाचे डॉ. संकेत कुलकर्णी यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.

मुंबईतील स्वाईन फ्ल्यूच्या परिस्थितीविषयी माहिती देतांना आरोग्यमंत्री म्हणाले की, १ जानेवारी पासून आजतागायत मुंबईत स्वाईन फ्ल्यू आजाराचे २८५ रुग्ण आढळले असून त्यापैकी १० जणांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत झालेल्या मृत्यूपैकी दोन तृतीयांश व्यक्तींना मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार होते. तसेच मृतांपैकी तीन महिला गर्भवती होत्या.

स्वाईन फ्ल्यूवर तत्काळ उपाय केल्यास या रोगाचा प्रसार होण्यापासून अटकाव होऊ शकतो परंतु बऱ्याच वेळा रुग्णाकडून उपचार उशिरा सुरु केले जातात. हे टाळण्यासाठी आणि स्वाईन फ्ल्यूमुळे जाणारे लोकांचे प्राण वाचविण्यासाठी या आजाराबाबत लोकप्रबोधन होणे आवश्यक आहे. त्यासाठी आरोग्यशिक्षण अधिक प्रभावीपणे करण्यात यावे, खाजगी डॉक्टरांच्या कार्यशाळा घेण्यात याव्यात, तसेच सर्वेक्षण अधिक प्रभावीरित्या करण्यात यावे, असे देखील आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
स्वाईन फ्ल्यूच्या रुग्णांवर अतिजोखमीच्या गटात औषधोपचार होणे आवश्यक आहे तसेच डॉक्टरांनी फ्ल्यूच्या रुग्णावर उपचार करताना सतत प्रयोगशाळा तपासणीचा आग्रह धरणे देखील चुकीचे असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Post Bottom Ad