शिवाजी नगर बस डेपोतील भूखंड भाडेतत्वावर देण्यात येणार - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

07 June 2017

शिवाजी नगर बस डेपोतील भूखंड भाडेतत्वावर देण्यात येणार

बेस्टला ३० महिन्यात ४ कोटी २१ लाख भाडे मिळणार -
मुंबई / अजेयकुमार जाधव -
आर्थिक तोट्यात असलेल्या बेस्ट उपक्रमाने आपली आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी विविध उपाय योजना सुरु केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून बेस्टच्या शिवाजी नगर येथे डेपो साठी आरक्षित असलेल्या भूखंडा पैकी विना वापराची जागा शिवाजी नगर ते घाटकोपर जंक्शनचा पूल बांधणाऱ्या कंपनीला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय बेस्ट प्रशासनाने घेतला आहे. तसा प्रस्ताव बेस्ट समितीपुढे सादर करण्यात आला आहे.

बेस्ट उपक्रमाने १९८१ मध्ये देवनार शिवाजी नगर गावठाण येथील ७९९८६.९० चौरस मिटर जागा मुंबई महानगर पालिकेकडून भाडे तत्वावर घेतली आहे. त्यापैकी यापैकी २६०२९.५० चौरस मीटर जागेवर बस आगार, ३२७६ चौरस मीटर जागेवर बस स्थानक, २४६५१.८५ चौरस मीटर जागेवर सेवकवर्ग वसाहतीचे बांधकाम केले आहे. इतर अंदाजित २६०२९.५० चौरस मीटर जागा बेस्टने अंशतः विकसित केली असून सध्या हि जागा अशीच बिना वापराची पडून आहे. यापैकी काही जागा मेसर्स जेएमसी प्रोजेक्स्टस (इंडिया) लिमिटेडला भाडेतत्वावर दिली जाणार आहे.

मेसर्स जेएमसी प्रोजेक्स्टस (इंडिया) लिमिटेड यांना मुंबई महानगर पालिकेने बैंगन वाडी पासून देवनार डम्पिंग जंक्शन, शिवाजी नगर जंक्शन ते घाटकोपर मानखुर्द लिंक रॉड पर्यंत उड्डाणपूल बांधण्याचे काम दिले आहे. प्रस्तावित पुलाचे मूर्त स्वरूपातील स्पॅन तयार करता सुकर व्हावे म्हणून या कंपनीने कास्टिंग यार्ड साठी डेपोची वापरात नसलेली जागा भाडेतत्वावर मागितली आहे. डेपोची हि जागा घाटकोपर मानखुर्द जोड मार्गातून जाणाऱ्या संपर्क रस्त्याच्या आवश्कतेकरिता रिक्त ठेवण्यात आली आहे.

बेस्ट समितीपुढे सादर झालेल्या प्रस्तावानुसार मेसर्स जेएमसी प्रोजेक्स्टस (इंडिया) लिमिटेड यांना १०११७ चौरस मिटर जागा १३९ रुपये प्रति चौरस मिटर प्रति महिना प्रमाणे ३० महिन्याकरीत भाडे तत्वावर देण्यात येणार आहे. यामधून बेस्टला मासिक १४ लाख ६ हजार २६३ रुपये भाड्याप्रमाणे ३० महिन्यात ४ कोटी २१ लाख ८७ हजार ८९० रुपये इतके भाडे तसेच ८४ लाख ३७ हजार ५७८ रुपये इतकी सुरक्षा ठेव म्हणून बेस्टला मिळणार आहे.

Post Bottom Ad