
बेस्टच्या बस मधून मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांप्रमाणे खाजगी शाळेतील विद्यार्थ्यांनाही मोफत प्रवास करण्याची मुभा मिळावी अश्या मागणीचे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेसकडून बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांना देण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई अध्यक्षा सुरेखा पेडणेकर, बेस्ट समिती सदस्या रत्ना महाले, दक्षिण जिल्हा अध्यक्षा पुष्पा हरियन, उत्तर मुंबई जिल्हा अध्यक्षा फायमीदा खान.
