
मुंबई महापालिकेच्या चेंबूर नाका येथील भाऊराव चेंबूरकर मंडईमधील गाळेधारकांच्या विविध प्रश्नांवर नगरसेविका आशा मराठे यांच्या प्रयत्नाने संयुक्त बैठक बोलावण्यात आली होती. महापालिका मुख्यालयातील बाजार आणि उद्यान समिती अध्यक्षांच्या दालनात संपन्न झालेल्या बैठकीला बाजार आणि उद्यान समितीच्या अध्यक्षा सान्वी तांडेल, भाजपाचे मुंबई सरचिटणीस खुशाल जैन, सुभाष मराठे इत्यादी मान्यवर तसेच पालिका अधिकारी उपस्थित होते.
