लेटर बॉम्बचा बनाव प्रेयसीच्या अंगलट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

लेटर बॉम्बचा बनाव प्रेयसीच्या अंगलट

Share This
मुंबई - माजी प्रियकराच्या त्रासाला कंटाळून त्याला अद्दल घडवण्यासाठी प्रेयसीने लेटर बॉम्बचा बनाव रचला. मात्र, रेल्वे पोलीस (जीआरपी), सुरक्षा बल (आरपीएफ), दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) यांनी संयुक्तपणे केलेल्या कारवाईमुळे ४८ तासांच्या आत लेटर बॉम्बचा बनाव उघडकीस आणून दोघांना ताब्यात घेतले.


रत्नागिरी येथील महाविद्यालयात शिक्षण घेत असताना, शिवानी भिंगार्डे (२४) या तरुणीचे मुझफ्फर नावाच्या मुलावर प्रेम बसले. शिक्षण संपल्यावर त्यांच्या प्रेमात वितुष्ट निर्माण झाल्याने त्यांचे नाते संपुष्टात आले. मुझफ्फरचे लग्न होऊनही तो शिवानीशी जवळीक साधून तिला त्रास देत असे. यामुळे मुझफ्फरला अद्दल घडण्यासाठी शिवानीने मुंबई-पुणे रेल्वे स्थानकांवर अतिरेकी बॉम्ब हल्ला होणार असून, मुझफ्फर हा हल्ला करणार असल्याचे पत्रात लिहिले. त्या पत्रात मुझफ्फरचा मोबाइल नंबरसह अन्य २ मोबाइल नंबर लिहून ते पत्र पर्समध्ये ठेवले. दादर स्थानकावर बेवारस पर्स सापडल्याचा बनाव शिवानीने करत ती पर्स आरपीएफ जवानांच्या ताब्यात दिली. त्यानुसार, एटीएसने मुझफ्फरला कोथरूड रोड, पुणे येथून ताब्यात घेत चौकशी केली. त्या वेळी पोलिसांनी त्याला सीसीटीव्ही फुटेज दाखवल्यानंतर हा प्रकार उघड झाला.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages