केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल : महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवार यशस्वी - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

०१ जून २०१७

केंद्रीय लोकसेवा आयोगाचा निकाल : महाराष्ट्रातील 100 हून अधिक उमेदवार यशस्वी

नवी दिल्‍ली, 1 June 2017 - केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत देशातील एकूण १,०९९ उमेदवारांपैकी १०० हून अधिक महाराष्ट्रातील उमदेवारांनी यश संपादन केले आहे. पुणे येथील विश्वांजली गायकवाड ही राज्यातून प्रथम तर देशात गुणानूक्रमे ११ व्या स्थानावर आहे.


केंद्रीय लोकसेवा आयोगाचा वर्ष २०१६ च्या परिक्षेचा अंतिम निकाल बुधवारी रात्री जाहीर झाला. या निकालात पहिल्या १०० उमेदवारांमधे महाराष्ट्रातील ३ उमेदवारांचा समावेश आहे. यात गुणानूक्रमे ११ व्या स्थानावर विश्वांजली गायकवाड , स्वप्नील खरे ४३ व्या स्थानावर आणि स्वप्नील पाटील ५५ व्या स्थानावर आहेत .

या परिक्षेत यश मिळविणा-या महाराष्ट्रातील उमेदवारांमध्ये भाग्यश्री विसपुते 103, प्राजंल पाटील 124, सुरज जाधव 151, स्नेहल लोखंडे184, अनुज तरे 189, एैश्वर्या डोंगरे 196, विदेह खरे 205, अंकिता ठाकरे 211, अखिल महाजन213, योगेश भारसत 215, निकिता पंत 217, किरण खरे 221, व्यकेंटश धोत्रे 246, दिग्वजय बोडके 247, आदित्य रत्नपारखी 257 , प्रविण इंगवले 267, परिक्षित झाडे 280, सौरभ सोनवणे 293, राघवेंद्र चांभोलकर 321, आशिष पाटील 330, आकाश यादव 346, अनिता यादव 350, अमरेश्वर पाटील 376, कुलदीप सोनवणे 384, मुकूल कुलकर्णी 394, कपिल गाडे 401, अंजिक्य काटकर 411, संदेश लोखंडे 416, श्री. आशिष काटे 466, श्रीधर धुमाळ 499,नम्रता कैरा 530, प्रतिक पाटील 544, संतोष सुखदेवे 546, गोकुळ महाजन 582, गोरख भांब्रे590, स्वप्नील थोरात 614, दशधिपाल नंदेश्वर 621, प्रविण डोंगरे 644, वैष्णवी बनकर 651,स्वप्नीलकुमार सूर्यवंशी 670, मिलिंद जगताप 671, नितिन बगाते 673, श्रुती हनकरे 679,सुधिर पाटील 680, विनोद चौधरी 681, मोनाली फडतरे 684, शुभम ठाकरे 686, सचिन मोटे690, माधव वणवे 701, निवृत्ती आव्हाड 706, गगनगिरी गोस्वामी 710, शरयु आधे 711, वैभव व्हावळ 719, सदानंद कसळू 724, रोहन घुगे 736, रविराज कलशेट्टी 751, धिरज मोरे 756,सुरेश चौधरी 757, सुशांत पाटील 759, अरविंद रेनगे 762, अक्षय कोंडे 763, दिपक धामणे777, प्रमोद जाधव 790, राहुल तिरसे 792, अजय पवार 797, तुषार घोरपडे 817, सचिन पाटील 824, निखिल बोरकर 825, मनिषा आव्हळे 833, अभिजित इचके 844, सचिन फुसे853, संग्राम देशमुख 864, सुरज थोरात 868, अभिषेक ताळे 877, वैभव काजळे 880, गौरव राऊत 890, सारंग पोफळे 892, मनोज महाजन 903, रूपेश शेवाळे 920, प्रविण सिनरे 933,राहूल रायसिंग 947, सुमित कुमाटे 962, शिवम धामणकर 968, जयपाल देठे 970, गौरव मेश्राम976, अविनाश शिंदे 978, प्रज्ञा खंडारे 984, अमोघ थोरात 995, सत्वसिंग कांबळे 1010, वैभव दहीवले 1012, धम्मपाल खंडागळे 1020, प्रिती तुरेराव 1031, लोकेश दातल 1055, शिवानी झिरवळ 1062, स्नेहल भापकर 1089, वर्षा करंडे 1098 यांचा समावेश आहे.

एक नजर संपूर्ण निकालावर -
केंद्र शासनाच्या विविध सेवांमधील रिक्त जागांसाठी २०१६ मध्ये परीक्षा घेण्यात आली लेखी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची यावर्षीच्या मार्च आणि मे महिन्यात मुलाखत घेण्यात आली. या परिक्षेच्या निकालातील उत्तीर्ण १,०९९ उमेदवारांची केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध सेवेतील पदांच्या नियुक्तीसाठी शिफारस केली आहे. यामध्ये सामान्य (ओपन) गटातून – ५००,इतर मागासवर्गीय प्रवर्गातून(ओबीसी) – ३४७, अनुसूचित जाती प्रवर्गातून (एससी) – १६३,अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ८९ उमेदवारांचा समावेश आहे. एकूण यशस्वी उमेदवारांत 21शारीरीकरित्या अपंग उमेदवारांचा समावेश आहे. लोकसेवा आयोगाने २२० उमेदवारांची आरक्षित सूची (Reserve List) तयार केली आहे. यामध्ये सामान्य गट- ११०, इतर मागास वर्ग -८७, अनुसूचित जाती- २०, अनुसूचित जमाती - ०३ उमेदवारांचा समावेश आहे.

या रिक्त पदांवर उमेदवार होतील रूजू -
भारतीय प्रशासन सेवा (आय.ए.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – १८० जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (जनरल) – ९०, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) –४९, अनुसूचित जाती (एस.सी.) – २७, अनुसूचित जमाती (एस.टी.) – १४ जागा रिक्त आहेत. गुणाणूक्रमे रिक्त जागांवर यशस्वी उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

भारतीय विदेश सेवा (आय.एफ.एस.) या सेवेत शासनाकडे एकूण – ४५ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गट (ओपन) – २६, इतर मागास वर्ग (ओ.बी.सी.) – १२, अनुसूचित जाती (एस.सी.) – ०६, अनुसूचित जमाती (एस.टी.) – ०१ जागा रिक्त आहेत.

भारतीय पोलिस सेवा (आय.पी.एस.) या सेवेमध्ये एकूण – १५० जागा रिक्त आहेत, यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - ८१ उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - ३७, अनुसूचित जाती प्रवर्गातून - १८, तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – १४ उमेदवारांना नियुक्ती दिली जाणार आहे.

केंद्रीय सेवा गट अ - या सेवेमध्ये एकूण - ६०३ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) - ३०६ उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - १६६, अनुसूचित जाती प्रवर्गातून - ८८ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – ४३ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

केंद्रीय सेवा गट ब - या सेवेमध्ये एकूण – २३१ जागा रिक्त आहेत. यामध्ये सामान्य गटातून (ओपन) -१०७ उमेदवार, इतर मागास प्रवर्गातून - ८३, अनुसूचित जाती प्रवर्गातून – २४ तर अनुसूचित जमाती प्रवर्गातून – १७ उमेदवारांना नियुक्ती दिली जाईल.

Post Bottom Ad

JPN NEWS