सोलापूर जिल्ह्याला पावसाची आणि पाण्याची गरज – गणपतराव देशमुख - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

सोलापूर जिल्ह्याला पावसाची आणि पाण्याची गरज – गणपतराव देशमुख

Share This
मुंबई ( विशेष प्रतिनिधी ) – जुन मध्ये पेरण्या झाल्या आहेत थोडासा पाऊस पडला पण जुलै मध्ये पेरण्यानंतर अजिबाद पाऊस पडलेला नाही त्यात पाण्याची कमी आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला पावसाची आणि पाण्याची गरज असल्याचे शेकाप ज्येष्ठ आमदार गणपतराव देशमुख यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

देशमुख म्हणाले की, सोलापूर जिल्हातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतात ऊस, ज्वारी, भाजरी, मका, डाळिंबाची बाग आदी पिके लावले आहेत. आता त्यांना पाण्याची नितांत आवश्यकता आहे. नीरा-उजवा कालव्या तून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडण्यात आले आहे. पण पावसाने दुष्काळी भागात पाठ फिरवल्याने पाण्याची गरज सोलापूर जिल्ह्याला आहे. भविष्यातल्या संकटाची चाहूल महाराष्ट्राच्या वैभवाला लागलेले सर्वात मोठे गालबोट कोणते असेल तर तो म्हणजे दुष्काळ आणि त्या दुष्काळाने निर्माण झालेली पाणी बाणी होय. सध्याच्या दुष्काळाच्या दृष्टचक्राने किती बळीराजांना गिळंकृत केले ते आपणस माहित आहे. दुष्काळाच्या झळांमुळे महाराष्ट्राच्या गावगावांमधल्या लोकांचे जगणे कठीण बनले आहे. घोटभर पाण्यासाठी लोकांची वणवण सुरू आहे. पाणीबचतीचा संकल्प स्वतः पासूनच केला तर पाणीबाणीशी सामना करता येईल असे देशमुख यावेळी म्हणाले. पेरणीची कामे सुरू झाली असली तरी चांगल्या, सातत्यपूर्ण, सर्वदूर पावसाची गरज आहे. सध्या आभाळ ढगांनी भरून येते. मात्र, ते काही काळच थांबतात आणि पाहता पाहता नाहीसे होतात. हे आगळे वेगळे चित्र बदलण्यासाठी मुसळधार पावसाची गरज निश्‍चितच आहे. देशाच्या एकूण आर्थिक उत्पन्नात शेती क्षेत्राचा वाटा १४ टक्के आहे आणि पाऊस कमी झाल्यास शेती उत्पन्नावर व पर्यायाने एकंदर अर्थव्यवस्थेवर लक्षणीय परिणाम होतो. महाराष्ट्रात पडणाऱ्या पावसाचा विचार करता आपल्याकडे 'पाणी जिरवणे' व 'पाणी साठवणे' या दोन तंत्राची खूप जरुरी आहे. पाणी साठवण्यापेक्षा जमिनीत जिरविलेल्या पाण्याचा फायदा असा की, भूगर्भातील पाण्याचे बाष्पीभवन होत नाही व त्यामुळे त्यात घट होत नाही. त्यामुळे शेतीतील पीक चांगले येते, पीक चांगले आले की, शेतमालाला चांगला भाव मिळेल, चांगला भाव मिळाला म्हणजे शेतकऱ्याची आर्थिक प्रगती होईल, शेतकऱ्याच्या विकास झाला म्हणजे राज्याचा, देशाचा विकास होईल. सोलापूर जिल्ह्यात कायम कमी पाऊस पडतो. पाऊस कमी तर शेतकरी अडचणीत येऊ शकतो, असे देशमुख म्हणाले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages