
मुंबई, दि. २० : शिवडी येथील बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकास करण्या संदर्भातील प्राथमिक आराखड्याचे सादरीकरण गृहनिर्माण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या निवासस्थानी आज करण्यात आले. याप्रसंगी शिवडीचे नगरसेवक सचिन पडवळ, म्हाडाचे मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी सुभाष लाखे, गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव म. रा. पारकर, वास्तुविशारद एम.जी. सांभारे, म्हाडाचे वरिष्ठ अधिकारी आदि मान्यवर उपस्थित होते.
राज्यमंत्री वायकर म्हणाले, शिवडी येथील बी.डी.डी. चाळीच्या पुनर्विकास करण्यासंदर्भात दोन-तीन वेगवेगळे प्लॅन तयार करावे. केंद्र स्तरावर विविध मंजुरी घेण्यासाठी केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्यासमावेत बैठकीचे नियोजन करावे. इतर ठिकाणच्या रहिवाशांप्रमाणे येथील रहिवाशांना पुनर्वसन करताना तेवढ्याच क्षेत्रफळाचे घर देण्याचे नियोजन करावे, अशा सूचनाही वायकर यांनी यावेळी केल्या.