गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात वाढ करावी - मुख्यमंत्री - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 July 2017

गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात वाढ करावी - मुख्यमंत्री

मुंबई, दि. २० : राज्यात खाऱ्या पाण्यातील मत्स्यव्यवसायाबरोबरच गोड्या पाण्यातील मत्स्य व्यवसायात मोठ्या प्रमाणात वाढ करण्यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले.

पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विकास विभागाची आढावा बैठक मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा निवासस्थानी पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य विकास मंत्री महादेव जानकर, मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविण परदेशी, पदुम विभागाचे सचिव विकास देशमुख, पशुसंवर्धन आयुक्त कांतीलाल उमाप, मत्स्य व्यवसाय आयुक्त अरुण शिंदे, दुग्धविकास आयुक्त आर. आर. जाधव उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठकी दरम्यान विविध सूचना दिल्या. ते म्हणाले, राज्यात मत्स्ययुक्त तलाव योजना कार्यान्वित करावी. राज्यात 114 कोटी मत्स्य बिजाची आवश्यकता असताना प्रत्यक्षात कमी प्रमाणात मत्स्यबीज उत्पादन होत असल्याने उर्वरित मत्स्यबीज इतर राज्यातून आयात करावे लागते. मत्स्यबीज उत्पादनात राज्याला स्वयंपूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत. राज्यातील पशुसंवर्धन विभागाच्या फार्मस् वरील अतिक्रमणांचे अचूक मोजमाप करण्यासाठी ड्रोणद्वारे सर्वेक्षण करावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

Post Bottom Ad