मुंबईच्या रस्त्यांवरील दोन खड्डे भरायला 22 हजार रुपयाचा खर्च - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

21 July 2017

मुंबईच्या रस्त्यांवरील दोन खड्डे भरायला 22 हजार रुपयाचा खर्च


मुंबई / प्रतिनिधी - मुंबईच्या रस्त्यावर वर्षानुवर्षे खड्डे पडत आले आहेत. पालिकेने हे खड्डे बुजवल्या नंतर पुन्हा खड्डे पडल्याचे चित्र दरवर्षी मुंबईत पाहायला मिळते. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांवर पालिकेकडून वषर्षानुवर्षे विविध प्रयोग करण्यात आले नवनवी तंत्रज्ञान वापरण्यात आली तरीही रस्त्यावर खड्डे पडतच आले आहेत. यामुळे मुंबई महापालिकेचा आता देशातील तंत्रज्ञानावर विश्वास राहिलेला नसल्याने रस्त्यांवरील खड्डे भरायला ऑस्ट्रेलिया मधील मिडास टच व इस्त्रायलमधील स्मार्टफील नावाचे मटेरियल वापरले जात आहे. मुंबई महापालिका मुख्यालयासमोर पडलेले दोन खड्डे भरण्यासाठी तब्बल २२ हजार रुपये खर्च करण्यात आले आहेत. या मटेरियल मुळे तीन वर्ष खड्डा उखडणार नाही असा दावा पालिकेने केला आहे.

विदेशातून आणलेले 38 टन कोल्डमिक्स मुसळधार पाऊस पडूनही महिनाभर वापराविना गोदामात पडून होते. खड्डे पडूच नये यासाठी भर पावसांत हे मटेरियल वापरता यावे म्हणून 38 टन कोल्डमिक्स पालिकेने 70 लाख रुपये खर्च करून खरेदी केले आहे. मुंबईत रस्त्यांची खड्ड्यामुळे चाळण झाली तरी पालिकेने विदेशातून मागवलेले कोल्डमिक्स महिनाभर गोदामात पडून होते. याबाबत वृत्तपत्रातून टिका झाल्यावर पालिकेला आपल्याकडे विदेशी तंत्रज्ञान असल्याचा साक्षात्कार झाल्यावर हे कोल्डमिक्स दोन दिवसांपासून वॉर्डनिहाय वाटप करण्यात येते आहे. काही रस्त्यावरील खड्ड्यांवर याचा वापर करण्यासही सुरुवात झाली आहे. 80 टक्के आता व 20 टक्के कोल्डमिक्सचा वापर गणेशोत्सवाच्या दरम्यान वापरले जाणार आहे. मात्र अजूनही 19 वॉर्डात या मटेरियलचे वाटप करण्यात आलेले नाही. येत्या दोन दिवसांत याचे वाटप करून त्याचा वापर रस्त्यावर केला जाईल, असे एका अधिका-याने सांगितले.

दरम्यान मुंबई महापालिकेच्या मुख्यालयासमोर पालिकेने बनवलेल्या सेल्फी पॉइंट्सच्या समोरच खड्डे पडले होते. पालिका मुख्यालयासमोरच खड्डे असतील तर इतर मुंबईमधील रस्त्यांची काय परिस्थिती असेल असा प्रश्न मुंबईकर उपस्थित करत होते. तश्या वृत्तपत्रातून बातम्याही प्रसिद्ध झाल्या होत्या. याची दखल घेत शुक्रवारी पालिकेच्या ए विभागाकडून या खड्ड्य़ांवर कोल्डमिक्सचा वापर केला. 130 रुपये किलो असा या मिडास टचचा दर असून पालिकेसमोरील दोन खड्डे भरण्यासाठी तब्बल 22 हजार रुपये आला आहे. पालिकेच्या ए विभागातील खडडे भरण्यासाठी अद्याप 168 किलो मटेरियल वापरण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे परदेशी मिडास टच महागड ठरत आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. मोठा पाऊस असताना या तंत्रज्ञानाचा वापर केला जाऊ शकत असून या मटेरियलने बुजलेला खड्डा ३ वर्षे उखडत नाही असा पालिकेकडून दावा करण्यात आला आहे.

Post Bottom Ad