नवी मुंबई – प्युराटोस संस्कार फाऊंडेशन स्कूलमधील बेकर्स ग्रॅज्युएटची दुसरी बॅच बाहेर पडली. रेगेंझा बाय तुंगा हॉटेलमध्ये पदवीदान सोहळ्यात विद्यार्थ्यांना पदवी देण्यात आली. प्युराटोस इंडिया या नवी मुंबईतील संस्थेतर्फे चालवल्या जाणाऱ्या ना नफा ना तोटा तत्त्वावरील या बेकरी स्कूलने मधून प्रशिक्षण घेऊन नवी १२ विद्यार्थ्यांची बॅच बाहेर पडली आहे. या मुलांना बेकरी कौशल्यांचे पूर्ण प्रशिक्षण देण्यात आले आहे.
प्युराटोस इंडिया ही प्युराटोस इंटरनॅशनल ग्रुप या जगातील सर्वात मोठ्या बेकरी, पेस्ट्रीज आणि चॉकलेट सामुग्री बनवणाऱ्या कंपनीची उपकंपनी आहे. प्युराटोसची आंतरराष्ट्रीय मानके जपत या विद्यार्थ्यांनी दोन वर्षांच्या अभ्यासक्रमात साधा ब्रेड बनवण्यापासून अनेक केक व मिष्टान्न बनवण्याचे प्रशिक्षण घेतले आहे. आता ही मुले बेकरी, पेस्ट्रीज व चॉकलेटच्या आकर्षक पदार्थ बनवण्यास सज्ज झाले आहेत.
प्युराटोसच्या एशिया/ पॅसिफिक/ मिडल ईस्ट/ आफ्रिका विभागाचे मार्केट्स डायरेक्टर पीटर डेरीमेकर म्हणाले, एशिया खंडात भारत अनेक क्षेत्रांमध्ये विशिष्ट आघाडीवर आहे. बेकरी, पेस्ट्री व चॉकलेट या विभागाला इथल्या अनेक छोट्या आणि मोठ्या शहरांमध्ये प्रचंड मागणी आहे. मात्र, त्याचवेळी इथे कौशल्यपूर्ण प्रोफेशनल्सची कमतरता आहे, असे आमच्या लक्षात आले. आमच्या या उपक्रमातून आमची आंतरराष्ट्रीय पातळीवरील कौशल्ये भारतात आणून इथले बेकर्स, मालक, कर्मचारी आणि बेकरीच्या ग्राहकांना जास्तीत जास्त चांगले पदार्थ देण्याची इच्छा आहे.
प्युराटोस फूड इंग्रेडिएटंस इंडिया प्रा. लि. च्या दक्षिण एशिया विभागाचे एरिआ डिरेक्टर आणि भारतातील एमडी धिरेन कंवर म्हणाले, बेकरी, पेस्ट्रीज आणि चॉकलेटच्या पदार्थांची भारतातील वाढती आवड लक्षात घेता या मागण्या पूर्ण करण्याची हीच योग्य वेळ आहे. त्याचप्रमाणे, आपल्या कामातील खाचाखोचा नीट जाणणाऱ्या व आपल्या कामावर प्रेम करणाऱ्या प्रशिक्षित प्रोफेशनल्सची बेकरी विश्वात गरज दिसत असल्यामुळे आम्ही या १२ मुलांना प्रशिक्षित केले आहे.
आम्ही प्रशिक्षित केलेल्या १२ विद्यार्थ्यांच्या या संपूर्ण बॅचला रोजगार मिळाला असून पॅंट्री हॉस्पिटॅलिटी, पेस्ट्री पॉईंट, ओव्हन फ्रेश, स्टार अनिस, डॉ. ब्राऊन कन्फेक्शनरीज, बर्गर्स एंड मोअर व चोकोसर्कल अशा आघाडीच्या बेकरीजमध्ये त्यांना नोकरीची संधी ही मिळाली आहे. तर दोन विद्यार्थ्यांना प्युराटोस इंडियासोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.
भारतात या उपक्रमाची सुरुवात प्युराटोसने २०१४ मध्ये केली. आपल्या कौशल्यांच्या क्षेत्रात अधिक चांगली मुल्ये आणावीत, हा हेतू या संस्थेचा होता. बेकरी, पेस्ट्री आणि चॉकलेट क्षेत्रातील तज्ज्ञ या नात्याने वंचित व दारिद्र्यरेषेखालील समाजातील तरुण वर्ग आणि शिकण्यास उत्सुक असलेल्या मुलांना प्युराटोसने प्रशिक्षित करुन स्वतःची एक जागा निर्माण करण्यास मदत केली आहे. ही संस्था विद्यार्थ्यांना उत्कृष्ट शिक्षकांकडून शिकण्याची आणि बेकरी, हॉस्पिटॅलिटी क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांसोबत काम करण्याची संधी देते.