
मुंबई / प्रतिनिधी - घाटकोपरच्या सिध्दी साई इमारतीमध्ये तळमजल्यावर सुरु असलेल्या बांधकामात काही पिलर्स तोडून त्या जागी लोखंडी चॅनल लावून बिल्डिंगला टेकू देण्यात आला होता. या दुरुस्तीच्या कामादरम्यान एकाचवेळी सर्व भिंतीं तोडण्यात आल्याची धक्कादायक माहिती येथील रहिवाश्यांनी दिल्याने इमारत पिलर व भिंती तोडल्यानेच पडली हि धक्कादायक बाब उघड झाली आहे. साई सिद्धी इमारत चार मजतयाची होती. तळमजल्यावर असलेले नर्सिंग हाेम २०१६ साली बंद झाल्यानंतर तेथे हाॅटेल सुरू करण्याचा साेसायटीतील सदस्य सुनील शितप यांचा प्रयत्न हाेता. नुतनीकरणाला सुरुवात केल्यानंतर तळमजल्यावरील पिलर्स ताेडतानाच इमारतीच्या मूळ रचनेतच बदल करण्याचा प्रयत्न केला गेला. इमारतीचा पायाच कच्चा झाल्याने इमारत कोसळण्याची दुर्घटना घडली असल्याचा आरोप येथील रहिवाशांनी केला आहे.
या इमारतीच्या तळमजल्यावर डॉ. पूजा खाडे यांचे काही महिने प्रसुतिगृह सुरू हाेते. ते अलिकडेच बंद झाल्यानंतर पहिल्या निवासी मजल्यावर सुनील शतप यांनी तेथे हॉटेल सुरू करण्याचा घाट घातला होता. त्यानंतर तळमजल्यावर नुतनीकरण आणि अन्य बांधकामाला सुरुवात करून पिलर्स हटवण्याचे कामही त्याने सुरू केले. त्यावेळी काही रहिवाशांनी आक्षेप घेतला असता शितप यांनी त्यास दाद दिली नाही, असे रहिवाशांनी सांगतले. इमारतीच्या मूळ रचनेत बदल करण्याच्या विराेधात रहिवाशांनी सितप यांच्याकडे तक्रारी केल्या हाेत्या. पण त्याची दखल न घेता तुम्हाला काय करायचे ते करा अशी त्याची भूमिका हाेती. सितप याने पिलर ताेडून लाेखंडी खांबांचा टेकू दिला हाेता. इतक्याशा टेकूवर इमारत भार कशी सहन करणार असा अाराेप करतानाच रामचंदानी यांची मुलगी बिनिता आहुजा यांनी इमारत दुर्घटना ग्रस्तांना न्याय मिळण्याबराेबरच दाेषींना कडक शिक्षा केली पाहिजे अशी मागणी केली. या दुर्घटनेत बचावलेले राजेश दोषी यांच्या परिचित ममता शहा यांनीही पिलर्स तोडल्यामुळे इमारतीचा पाया कमकुवत होऊन ही दुर्घटना घडल्याचा आरोप केला आहे.
गेल्या ३४ वर्षांपासून या इमारतीत राहत असलेले लालचंद रामचंदानी म्हणाले की, दर आठ - दहा वर्षांनी दुरुस्ती करण्यात येत असल्याने इमारतीची स्थिती चांगली होती. महानगरपालिकेची कोणतीही नोटीस आतापर्यंत मिळालेली नाही. त्यामुळे टेन्शन नव्हते. परंतु सुनील शितपमुळे टेन्शन वाढले. शितप यांचे तळमजल्यावर तीन फ्लॅट होते. या फ्लॅटचे पहिल्यांदा रुग्णालयात रुपांतर केले त्यावेळी हरकत घेतली. पण तुम्हाला जे करायचे ते करा असे म्हणून त्याने ते हाॅस्पिटल बांधले. सात वर्ष हाॅस्पिटलचा वापर केल्यानंतर गेल्या २५ दिवसांपासून ते बंद हाेते. या रुग्णालयाचे हाॅुटेलमध्ये रुपांतर करण्यासाठी त्याने भिंतीचे पार्टिशन ताेडले त्याचप्रमाणे तिन्ही सदनिकांच्या चारही बाजुचे प्लॅस्टर काढून टाकले अाणि मधल्या भागातील फाऊंडेशन काढून टाकले. अाधार देण्यासाठी खिडक्यांवर लाेखंडाचे रॉड लावले. जर एकेका भिंतीचे प्लॅस्टर काढले असते तर इमारत पडली नसती. जर पायाच पक्का नसल्याने इमारत कशी उभी राहणार. मूळात निवासी जागेचा व्यावसायिक कामासाठी वापर करण्यास परवानगी कशी दिली असाही प्रश्न रामचंदानी यांनी उपस्थित केला.