स्मार्ट अंगणवाडी संकल्पना कारागृहातील अंगणवाडीत प्राधान्याने राबविणार - पंकजा मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

१९ जुलै २०१७

स्मार्ट अंगणवाडी संकल्पना कारागृहातील अंगणवाडीत प्राधान्याने राबविणार - पंकजा मुंडे


मुंबई दि. १९ - राज्यातील सर्व कारागृहातील महिला बंदींच्या सहा वर्षाखालील बालकांसाठी राबविण्यात येणाऱ्या अंगणवाडीमध्ये स्मार्ट अंगणवाडी संकल्पना प्राधान्याने राबविणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. 

मुंडे यांच्या मंत्रालयीन दालनात महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाच्या शिष्टमंडळासोबत आयोजित बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी महाराष्ट्र राज्य बाल हक्क आयोगाचे अध्यक्ष प्रविण घुगे यांच्यासह आयोगाचे सदस्य संतोष शिंदे, विजय जाधव आणि प्रा. अस्मा शेख यांची उपस्थिती होती.

मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, कारागृहातील महिला बंदींच्या बालकांना अंगणवाडीत त्यांना देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा स्मार्ट संकल्पनेनुसार देण्यात येणार असून ही स्मार्ट अंगणवाडी संकल्पना राज्यात सर्व कारागृहातील अंगणवाडीपासून सुरु करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. आयोगाच्या शिष्टमंडळाबरोबर कारागृहातील बालकांच्या विविध समस्येवर मंत्री मुंडे यांनी चर्चा केली. आयोगाच्या शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या बालकांच्या समस्या सोडविण्यासाठी सकारात्मक निर्णय घेतले जातील असे मंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्यांनी स्मार्ट अंगणवाडी कारागृहातील अंगणवाडीस प्राधान्यक्रम दिल्याबद्दल आभार मानले.

Post Bottom Ad

JPN NEWS