मोडक सागर पाठोपाठ तानसा धरणही ओव्हरफ्लो - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

18 July 2017

मोडक सागर पाठोपाठ तानसा धरणही ओव्हरफ्लो


मुंबई / प्रतिनिधी - मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही धरण क्षेत्रात गेले महिनाभर चांगला पाऊस पडत असल्याने मोडक सागर पाठेपाठ तानसा धरणही आज (१८ जुलै, २०१७) सायंकाळी ४.५५ मिनिटांनी ओसंडून वाहू लागला आहे. गतवर्षी हा तलाव दिनांक २ ऑगस्‍ट, २०१६ रोजी पहाटे २ वाजून १० मिनिटांनी ओसंडून वाहू लागला होता. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणामध्ये चांगला पाऊस पडत असल्याने जुलैच्या १८ तारखेपर्यंत सर्व तलावामध्ये १० लाख २८ हजार ४२१ दश लक्ष लिटर्स पाणीसाठा जमा झाला आहे. यामुळे पुढील वर्षी मुंबईकरांना पाण्याची समस्या उद्भवणार नाही.

मुंबईला सात धरणांमधून पाणीपुरवठा केला जातो. यापैकी असलेले मोडक सागर धरण १८ जुलैला सकाळी ओव्हरफ्लो झाल्याने धरणाचे दोन गेट उघडण्यात आले होते. या धरणातून मुंबईला दररोज ४५५ दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होतो. मोडक सागर धरणा पाठोपाठ तानसा धरणही भरले आहे. तानसा मधून मुंबईकरांना ५३० दश लक्ष लीटर इतका पाणीपुरवठा होतो. मुंबईला वर्षभर चांगला पाणी पुरवठा होण्यासाठी तलावांमध्ये १ ऑक्टोबर रोजी १४ लाख ४७ हजार ३६३ दश लश लिटर पाणीसाठा असणे अवाश्यक आहे. १८ जुलैच्या पहाटेच्या ६ वाजताच्या पाण्याच्या अहवालाप्रमाणे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये १० लाख २८ हजार ४२१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. हा पाणीपुरवठा मुंबईकरांना २७४ दिवस पुरेल इतका आहे. सप्टेंबर अखेर पर्यंत पाऊस पडत असल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणारी सर्वच धरणे भरून वाहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

१८ जुलै २०१७ ला पाण्याची स्थिती
धरणाचे नाव      सध्या तलावातील साठा (
दशलक्ष लिटर)
अप्पर वैतरणा         १०९९०५
मोडक                    १२८९२५
तानसा                    १४१०६३
मध्य वैतरणा            १८०१००
भातसा                    ४४८९५२
विहार                        १४२८५
तुलसी                          ५१९०
एकूण                     १०२८४२१

Post Bottom Ad