
मुंबई, दि. २८ : मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचा निकाल लागण्याला होणारा विलंब पाहता पुढील वर्षी प्रश्नपत्रिका तपासण्याच्या प्रक्रियेतील दोष दूर करुन निकाल वेळेत लावण्यासाठी बृहत आराखडा तयार करणार येईल, असे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगिलते.
मुंबई विद्यापीठाच्या परीक्षांचे निकाल लावण्याचे काम अंतिम टप्प्यात असून सध्या ४लाख ७हजार प्रश्नपत्रिका तपासणीचे काम सुरु आहे. परीक्षांचे निकाल लवकर लावण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. विज्ञान शाखेच्या ९६ टक्के, तंत्रज्ञान विषयाच्या ९८ टक्के, व्यवस्थापन विषयाच्या ५२टक्के प्रश्नपत्रिका तपासून झाल्याचे श्री.तावडे यांनी सांगितले. विद्यापीठासंबधी अधिकार कुलपतींचे असल्याने निकालासंबंधी सदस्यांच्या भावना व्यक्तीश: कुलपतींपर्यंत पोहोचविणार असल्याचेही त्यांनी यावेळी सदस्यांना सांगितले. या लक्षवेधी सूचनेसंबंधीच्या चर्चेमध्ये सदस्य अमित साटम, आशिष शेलार यांनी सहभाग घेतला.
