बेस्ट दिना निमित्त ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

बेस्ट दिना निमित्त ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन

Share This

मुंबई / प्रतिनिधी -
७० व्या बेस्ट दिनानिमित्त रविंद्र नाट्यमंदीर, प्रभादेवी, दादर येथे बेस्ट उपक्रमाच्या ऐतिहासिक वस्तूंचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. सदर प्रदर्शनाचे उदघाटन खासदार अनिल देसाई यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्यावेळी बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ, विद्यमान आमदार आणि माजी बेस्ट समिती अध्यक्ष माननीय सुनील शिंदे, बेस्ट समिती सदस्य राजेश कुसळे, रत्ना महाले तसेच बेस्ट उपक्रमाचे वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते.

प्रदर्शनात बॉम्बे ट्रामवेज कंपनी ९ मे १८७४ ते बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रामवेज कंपनी २ ऑगस्ट १९०५ ते ७ ऑगस्ट १९४७ रोजी महापालिकाकरणानंतरची बेस्ट या दरम्यानच्या काळातील ऐतिहासिक माहिती असेल. तसेच पुरातन तिकीट यंत्रे, वाहतूक विभागाचे पुरातन बॅचेस, तिकीट यंत्रे, वाहतूक विभागाचे पुरातन बॅचेस, तिकीट पंच, बटणे, शिटी, पुरातन लाकडी तिकीट बॉक्स इत्यादी ठेवण्यात येणार आहे. या प्रदर्शनामध्ये लाकडी ट्रामची आसने, ट्रामचा पुरातन रॉकेल किंवा हॅन्ड सिग्नल, घोड्याने ओढल्या जाणाऱ्या ट्रामची व दुमजली विजेवरील ट्रामची चलप्रतिकृती, बेस्टच्या दुमजली बसची मोठी प्रतिकृती (सेल्फी पॉईंट) एकमजली व दुमजली ट्रामची मध्यम आकारातील लाकडी प्रतिकृती, विविध प्रकारच्या निवडक बस थांब्याची प्रतिकृती, मार्वे-मनोरी जलवाहतूक यांत्रिक नौकेची लाकडातील प्रतीकृती, बेस्ट बसेसच्या हुबेहूब कागदी प्रतीकृती, सात बंगला बस स्थानकाची प्रतीकृती, संथगती मोटारवर फिरणाऱ्या बसच्या प्रतीकृती, इत्यादी वस्तूंचा प्रदर्शनात अंतर्भाव असणार असून हे प्रदर्शन सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ७ या वेळेत सर्वांसाठी विनामूल्य खुले आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages