मुंबई - घाटकोपर येथील सिद्धी साई इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून तीन लाख रुपये मदतीच्या धनादेशाचे वाटप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांच्या हस्ते आज विधानभवन येथे करण्यात आले. इमारत दुर्घटनेतील कुटुंबाच्या पुनर्वसनसाठी सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी दुर्घटनाग्रस्त इमारतीतील रहिवाशांना यावेळी सांगितले. उद्योग मंत्री सुभाष देसाई, आमदार राम कदम, नगरसेवक निल सोमय्या, इमारतीतील रहिवासी आदी यावेळी उपस्थित होते.