मुंबईकरांनो चक्रीवादळाच्या अफवेवर विश्वास ठेवू नका - मुंबई महापालिका - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

20 September 2017

मुंबईकरांनो चक्रीवादळाच्या अफवेवर विश्वास ठेवू नका - मुंबई महापालिका


मुंबई । प्रतिनिधी -
मुंबईत चक्रीवादळ येणार आहे. त्यामुळे वांद्रे वरळी समुद्रसेतू मार्ग बंद करण्यात येणार आहे अश्या सोशल मिडियावर अफवा पसरवल्या जात आहेत. वेध शाळेने असे कोणतेही चक्रीवादळ येणार नसल्याची माहिती दिली असल्याने मुंबईकरांनी अश्या अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहन मुंबई महापालिकेचे उपायुक्त सुधीर नाईक यांनी केले आहे.

मुंबईतील पावसाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना १९ संप्टेंबर ते २० सप्टेंबर या २४ तासात कुलाबा विभागात २०१ मिलीमीटर तर कुलाबा विभागात ३०३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून मुंबई शहरात १५२. ६६ मिलीमीटर, पूर्व उपनगरत १९४. ५५ मिलीमीटर तर पश्चिम उपनगरात २५९.८७ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याचे नाईक यांनी सांगितले. मुंबई शहरासह उपनगरांमध्ये आज दुपारी एक पर्यंत पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. मुंबई शहरात धारावी विभागात सर्वाधिक २३.१ मिलीमीटर पाऊस पडला तर पूर्व उपनगरात विक्रोळी येथे ४२.९२ मिलीमीटर आणि पश्चिम उपनगरात दिंडोशी भागात २२ मिलीमीटर पावसाची नोंद झाली, मुंबईत पाण्याचा निचरा होण्यास प्लास्टिक अडचणीचे ठरत असल्यामुळे प्लास्टिक बंदीबाबत लवकरच पालिका आयुक्त अजोय मेहता धोरण आखणार असल्याचे सुधीर नाईक यांनी स्पष्ट केले.

बुधवारी शासनाने कुठल्याही कार्यालयाला रजा जाहीर केलेल्या नाहीत. पालिकेत फक्त ५ टक्के कर्मचारी गैरहजर असून कर्मचाऱ्यांची उपस्तीथी मुख्यालयासहित सगळ्या २४ विभाग कार्यालयात उत्तम आहे असल्याचे नाईक म्हणाले. पावसात पाणी साचून नागरिकांना त्रास होऊ नये म्हणून पालिकेचे सुमारे ३५ हजार कर्मचारी दिवस रात्र कार्यरत आहेत. वांद्रे येथे अनेक गाड्या रस्त्यात नादुरुस्त झाल्यामुळे झालेल्या वाहतूक कोंडीमुळे नॅशनल कॉलेज जवळील रस्ता सोडून मुंबईतील सर्व रस्त्यांवर वाहतूक सुरळीत असल्याचे सुधीर नाईक यांनी सांगितले. मुंबई आणि परिसरात पाऊस पडत असल्याने मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वेच्या लोकल १५ ते २० मिनिटे उशिरा धावत होत्या.

येथे साचले पाणी -
मंगळवारी रात्री ११.४५ ला समुद्राला भरती असल्याने शहरात हिंदमाता, सायन रोड येथे पसचुईम उपनगरात विरा देसाई रोड, एअर इंडिया कॉलनी, मिलन सबवे, अंधेरी सबवे, नॅशनल कॉलेज बांद्रा, कोहिनुर सिटी मॉल, दहिसर येथे तर पूर्व उपनगरात रमाबाई आंबेडकर नगर, शेल कॉलनी चेंबूर, मानखुर्द या ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्राराई पालिकेकडे नोंद झाल्या आहेत.

भांडुपमध्ये दरड कोसळली -
पुर्व उपनगरात भांडुप येथे खिंडीपाड्यामध्ये साईनाथ मित्रमंडळाजवळील कब्रस्थानाजवळ आठ घरांवर दरड कोसळून दोन व्यक्ती जखमी झाल्या . या घटनेत जखमी झालेल्या विजयांदर जयस्वाल [ २७ वर्षे] व कृष्णा यादव [ २४ वर्ष ] यांना पालिकेच्या मुलुंड जनरल रुग्णालयात दाखल करण्यात आले दोन्ही जखमींची प्रकृती स्थिर आहे.

१६८ ठिकाणी झाडे पडण्याच्या घटना -
मुंबई शहरात ६०, पूर्व उपनगरात ३७ व पश्चिम उपनगरात ७१ अशा एकूण १६८ ठिकाणी झाडे तसेच फांद्या पडण्याच्या घटना घडल्या, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित किंवा वित्त हानी झालेली नाही, तर २१ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या, यामध्ये शहरात सात ठिकाणी, पूर्व उपनगरात नऊ ठिकाणी शॉर्ट सर्किटच्या घटना घडल्या.

मिठी नदी किनारी राहणाऱ्यांचे स्थलांतर - 
काळ रात्री मिठी नदीची पातळी २.८ मीटर इतकी वाढल्यामुळे क्रांतीनगर येथील झोपड्यांमध्ये राहणाऱ्या ८० ते व १०० लोकांना बैल बाजार पालिका शाळा व कराची खाजगी शाळेत तात्पुरत्या स्वरूपावर स्थलांतरित करण्यात आले होते.

Post Bottom Ad