मुंबईतील समुद्र किनारपट्टीवर मुंबई महापालिकेकडून सागरी किनारा रस्ता (कोस्टल रोड) बनवला जात आहे. या कामासाठी १७ कंत्राटदार पात्र झाले आहे. यासाठी निविदा प्रक्रिया सहा महिन्यांपासून सुरू होती. कोस्टलरोडसाठी आवश्यक परवाने, एनओसी मिळाल्या आहेत. मुंबई महानगरपालिकेत सत्ताधारी असलेल्या शिवसेनेचा कोस्टल रोड हा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. कोस्टल रोड बांधण्याच्या निविदा पूर्व एक कॉन्फरन्स करण्यात आली आहे. त्यात पात्र ठरलेले 17 कंत्राटदार सहभागी झाले होते. त्य़ात कंत्राटदारांच्यां शंकांचे निरसन करण्यात आले. कंत्राटदारांनी 774 शंका उपस्थित केल्या होत्या. या शंकांमध्ये 50 टक्के शंका कंत्राटासंबंधी, 20 टक्के वाणिज्य़ विषयक, 25 टक्के तांत्रिक दृष्ट्या आणि 5 टक्के कर आकारणी संदर्भात होत्या. या सर्व शंकांचे निरसन करण्यात आले. या परिषदेत तीन पॅकेजसवर चर्चा झाली. त्यामध्ये चौथे पॅकेज प्रिन्सेस स्ट्रीट ते प्रियदर्शनी पार्क भुयारी टनेल, पॅकेज 1 मध्य़े प्रियदर्शनी ते हाजीअल्ली, पॅकेज -2 मध्ये हाजीअली ते वरळी याचा अंतर्भाव होता. 31 ऑक्टोबरपर्य़ंत निविदा सादर करण्यात येतील. 4 डिसेंबर रोजी टेंडर ओपन होईल. आणि जानेवारी 2018 पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे.
मुंबईच्याी किनारपट्टीवर भराव टाकून, पूल आणि बोगद्यांचं बांधकाम करुन एकूण ३५.६ कि.मी. लांबीच्या कोस्टल रोडची बांधणी केली जाणार आहे. या कोस्टल रोडच्या पहिल्या टप्प्यासाठी ५३०३.३४ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. कोस्टल रोडवर अॅम्बुलन्ससाठी स्वतंत्र मार्गिका असणार आहे. ही मार्गिका पावणे तीन मीटर रुंदीची असेल. कोस्टल रोडला जोडून सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक तसेच खुले प्रेक्षागृह आदींचा समावेश असेल. कोस्टल रोड प्रकल्पासाठी बीआरटीएसची स्वतंत्र मार्गिका असेल, तसेच वाहनतळाचीही सुविधा असेल. त्यामुळे नागरिकांसाठी उत्तम प्रवास सुविधा या माध्यमातून उपलब्ध करुन दिली जात आहे. हा प्रकल्प झाल्यास ३४ टक्के अर्थात ३५० टन इंधनाची बचत होणार आहे. त्यामुळे प्रत्येक वर्षी १० कोटी डॉलर्सची बचत होणार आहे. या मार्गावर सागरी भिंतींची उभारणी केली जाईल. त्यामुळे सागरी किनाऱ्याची धूप होण्यापासून संरक्षण होईल, तसेच वादळी लाटा व पुरापासूनही संरक्षण होईल. सागरी मार्गाचे काम झाल्यावर सुमारे १ लाख लोकांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास पालिकेला आहे.