एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर किरीट सोमय्या गरबा खेळत होते ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर किरीट सोमय्या गरबा खेळत होते ?

Share This

मुंबई । जेपीएन न्यूज -
एल्फिस्टन रोड स्थानकात झालेल्या चेंगराचेंगरीत २३ जणांचा मृत्यू झाल्याने देशभरात शोक व्यक्त करण्यात आला. यासाठी भाजापाचे महापालिकेतील गटनेते मनोज कोटक यांनी त्या दिवशीचा गरबा बंद केला. मात्र त्यांच्याच पक्षाच्या खासदार असलेल्या किरीट सोमय्या हे गरबा खेळण्यात दंग होते. तसा एक व्हिडीओ वायरल झाला आहे. 

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांच्यावर सर्वच स्तरातून टीकेची झोड उठते आहे. या घटनेला 24 तास उलटत नाहीत, तोच खासदार किरीट सोमय्या हे गरबा खेळण्यात दंग होते का, असा सवाल सोशल मीडियावर उपस्थित केला जात आहे. किरीट सोमय्या यांचा गरबा खेळतानाचा व्हिडीओ एलफिन्स्टन दुर्घटनेच्या आधीचा आहे की नंतरचा, याबाबत मात्र अद्याप खातरजमा झालेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी यासंदर्भात ट्विटरवरुन किरीट सोमय्या यांच्यावर निशाणा साधला आहे. 


Post Bottom Ad

JPN NEWS

Pages