हातभट्टीची पिण्यापेक्षा रम पिया, त्यासाठी दलितांनी सैन्यात जावे - रामदास आठवले - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

हातभट्टीची पिण्यापेक्षा रम पिया, त्यासाठी दलितांनी सैन्यात जावे - रामदास आठवले

Share This
पुणे - आपल्या उलट-सुलट विधानामुळे चर्चेत राहणारे आरपीआय नेते आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुन्हा एकदा अशाच प्रकारचे विधान केले आहे. लष्करात चांगले खायला, प्यायला मिळते. शरीरयष्टी चांगली राहते, असे सांगतानाच आठवले यांनी हातभट्टीची पिण्यापेक्षा तिथे रम वगैरे मिळते. त्यामुळे दलित समाजातील तरुणांनी सैन्यात जावं, असे धक्कादायक वक्तव्य केले आहे. 

एका पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या निमित्ताने आठवले पुण्यात आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पत्रकार परिषदेत आणि लहुजी वस्ताद साळवे गुरुवर्य पुरस्कार वितरण सोहळ्यात बोलताना दलित समाजातील तरुणांसाठी सैन्य दलात आणि त्याच्या संलग्न विभागांमध्ये नोकरीसाठी विशेष आरक्षण असावे, या मागणीचा आठवले यांनी पुनरुच्चार केला. 

आम्ही लढवय्ये असून, देशासाठी बलिदान देण्याची आमची तयारी आहे. दलित समाजातील तरुणांना आता बाहेर नोकऱ्या मिळत नाहीत. लष्करात मोठ्या पगाराच्या नोकऱ्या आहेत. त्यामुळे दलित युवकांनी लष्करात भरतीसाठी प्रयत्न केले पाहिजेत असे आठवले यांनी सांगितले.

महागाई अजून कमी झालेली नाही मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रामाणिकपणे काम करीत असून त्यांच्या कामाचे रिझल्ट येण्यास वेळ लागेल.मोदींना अजून 5 वर्षे मिळाली तर ते बदल दिसून येऊ शकतील असेही आठवले म्हणाले. यावेळी रिपाइंचे शहराध्यक्ष महेंद्र कांबळे, उपमहापौर सिध्दार्थ धेंडे, परशुराम वाडेकर यावेळी उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages