कमला नेहरू पार्क परिसरातील इमारतींच्या उंचीवर मर्यादा - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

कमला नेहरू पार्क परिसरातील इमारतींच्या उंचीवर मर्यादा

Share This

मुंबई | प्रतिनिधी 7 Nov 2017 -
मुंबईतील प्रसिद्ध असे पर्यटन असलेल्या कमला नेहरू पार्क उद्यानातून 'मुंबई दर्शन' घडावे, यासाठी 'व्ह्यूईंग गॅलरी' आड येणाऱ्या टोलेजंग इमारतींच्या उंचीवर मर्यादा घालण्यात आल्या आहेत. मलबार हिलसह मरीन ड्राईव्ह परिसरात नव्याने उभ्या राहणाऱ्या उत्तुंग इमारतींचा यात समावेश आहे. त्यासाठी पालिकेनें या इमारतींचे जी. आय. एस प्रणालीद्वारे त्रिमितीय प्रतिकृती तयार केली असून याकरिता 1 कोटी 62 लाख रुपये खर्च केले आहेत. प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव कार्योत्तर मंजुरीसाठी स्थायी समितीसमोर सादर केला आहे.

मलबार हिलमधील कमला नेहरु उद्यानातील 'व्ह्यूईंग गॅलरी'मधून बॅकबे, मरीन ड्राईव्ह परिसराच्या पूर्व आणि दक्षिणेकडील दृष्टीक्षेपात येणाऱ्या इमारतींची 'जीआयएस'च्या मदतीने त्रिकोणात्मक प्रतिकृती बनवण्याची निर्देश नगरविकास खात्याने दिले होते. त्यानुसार ‘डी’ विभागाच्या विकास नियंत्रण आराखड्यावर दृष्टीक्षेपाचे कोन चिन्हाकिंत करण्यात आले. यामध्ये कोणतीही इमारत 21.35 मीटर पेक्षा अधिक उंचीची बांधता येणार नाही. या भागातील एकूण 108 भूखंड व परिसराची पाहणी करून यासाठी रेषेच्या नोंदी घेण्यात आल्या आहेत. तसेच त्यांचे जीआयएस प्रणालीत विश्लेषण करून डिजिटल एलिव्हेशन मॉडेल तयार करण्यात आले आहे. हे डिजिटल मॉडेल बनवण्यासाठी आयआयटी पवई या संस्थेची नेमणूक केली. निविदा न मागविताच हे काम आयआयटीला संस्थेला दिल्याने स्थायी समितीत सदस्य प्रशासनाला धारेवर धरण्याची शक्यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages