योकोहामाच्‍या स्‍थायी समिती सदस्‍यांनी महापौरांची घेतली सदिच्‍छा भेट - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

योकोहामाच्‍या स्‍थायी समिती सदस्‍यांनी महापौरांची घेतली सदिच्‍छा भेट

Share This

मुंबई । प्रतिनिधी 7 Nov 2017 -
योकाहामा म्‍युनिसि‍पल कौन्सिलच्‍या स्‍थायी समितीचे अध्‍यक्ष तदनूरी वाटनबे यांच्‍या नेतृत्‍वाखालील सदस्‍यांच्‍या शिष्‍टमंडळाने मुंबईचे महापौरविश्‍वनाथ महाडेश्‍वर यांची महापौर निवास, शिवाजी पार्क, दादर येथे सदि‍च्‍छा भेट घेऊन भगिंनी शहर संबध आणखी वृंध्‍दीगत करण्‍याबाबत चर्चा केली. याप्रसंगी उप महापौर हेमांगी वरळीकर, सुधार समितीचे अध्‍यक्ष अनंत नर, नगरसेवक सदानंद परब, योकाहामा म्‍युनिसि‍पल कौन्सिलच्‍या स्‍थायी समितीचे उपाध्‍यक्ष काटसुको कोशीशी, री फुमोटो, काजू टोनई, मास्‍तो योकायामा, रियोसुके सकाई, शिजो कानो, मस्‍तका ओटा, तसेच बृहन्‍मुंबई महानगरपालिकेचे उप आयुक्त (आपत्‍कालीन व्‍यवस्‍थापन) डॉ. किेशोर क्षिरसागर हे मान्यवर उपस्थित होते.

या भेटीदरम्यान मुंबईचे महापौर विश्‍वनाथ महाडेश्‍वर यांनी योकाहामा म्‍युनिसि‍पल कौन्सिलच्‍या स्‍थायी समितीचे अध्‍यक्ष तदनूरी वाटनबे यांचा पुष्‍पगुच्‍छ, बोधचिन्‍ह तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्‍या जीवनचरित्रावरील इंग्रजी कॉफी टेबल बुकची प्रत भेट दिली. दोन देशामध्‍ये असलेल्‍या भगिनी शहर संबंधातून कला व संस्‍कृतीची देवाणघेवाण होण्‍यास मदत होणार असल्‍याचे महापौरांनी यावेळी सांगितले. त्‍यासोबतच वाणिज्‍य व औद्योगिक संबंध आणखी वृंध्‍दीगत होतील असा विश्‍वासही महापौरांनी यावेळी व्‍यक्‍त केला. योकाहामा शहराच्‍या मुंबईतील कार्यालयाला लवकरच सदिच्छा भेट देणार असल्‍याचे महापौरांनी यावेळी सांगितले. योकाहामा म्‍युनिसीपल कौन्सिलच्‍या स्‍थायी समितीचे अध्‍यक्ष तदनूरी वाटनबे यांनी मुंबईच्‍या महापौरांना भेटून आनंद झाला असून योकाहामा शहराला भेट देण्‍याचे निमंत्रण लवकरच मुंबईच्‍या महापौरांना पाठविणार असल्‍याचे त्‍यांनी सांगितले. दोन्‍ही देशामध्‍ये तंत्रज्ञानाची देवाणघेवाण व्‍हावी असे मत उप महापौर श्रीम. हेमांगी वरळीकर यांनी यावेळी व्‍यक्‍त केले.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages