धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

धुक्यामुळे मध्य रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

Share This

मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत गेले ८ दिवस सकाळच्या वेळी शहारात धुके पसरले आहे. यामुळे मध्य रेल्वे लोकलचे सकाळी ११ वाजेपर्यंतचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे मध्य रेल्वेने वेळापत्रकात बदल करत १५ डिसेंबरपासून या गाड्या १० ते १५ मिनिटे लवकर सोडण्याचा निर्णय घेतला आहे. धुक्यामुळे कर्जत-कसाऱ्याहून निघालेल्या लोकलच्या सेवेवर परिणाम होत आहे. धुक्यामुळे दृश्यमानता कमी होत असल्याने मोटरमनला सिग्नल दिसणे कठीण होत आहे. याचा परिणाम लोकल सेवेवर जाणवत असल्यामुळे मध्य रेल्वेने कसारा आणि कर्जतहून सीएसएमटीच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांच्या वेळेत बदल केला आहे. मात्र कल्याण-सीएसएमटी मार्गावरील लोकल गाड्यांच्या वेळेत कोणताही बदल झालेला नाही, त्या नेहमीच्या वेळेतच सुटणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

कर्जत ते सीएसएमटी
गाडी                                 बदललेली वेळ             सध्याची वेळ
कर्जत ते सीएसएमटी       मध्यरात्री २.२५ वाजता     मध्यरात्री २.३५ वाजता
कर्जत ते सीएसएमटी       पहाटे ३.३१ वाजता         पहाटे ३.४१ वाजता
कर्जत ते सीएसएमटी       पहाटे ४.२७ वाजता         पहाटे ४.३२ वाजता
कर्जत ते सीएसएमटी       पहाटे ४.३९ वाजता         पहाटे ४.४७ वाजता
खोपोली ते सीएसएमटी      पहाटे ४.४० वाजता         पहाटे ४.५० वाजता
कर्जत ते सीएसएमटी       पहाटे ५.४५ वाजता         पहाटे ५.५३ वाजता

कसारा ते सीएसएमटी

गाडी                             बदललेली वेळ                    सध्याची वेळ
कसारा ते सीएसएमटी     पहाटे ४.१० वाजता        पहाटे ४.२५ वाजता
कसारा ते सीएसएमटी     पहाटे ४.४५ वाजता        पहाटे ५.०० वाजता
कसारा ते सीएसएमटी     पहाटे ५.५५ वाजता        पहाटे ६.१० वाजता
कसारा ते सीएसएमटी     सकाळी ६.३५ वाजता     पहाटे ६.४५ वाजता

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages