दिव्यांग जलतरणपटू कांचनमाला पांडेंचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

दिव्यांग जलतरणपटू कांचनमाला पांडेंचे मुख्यमंत्र्याकडून कौतुक

Share This

नागपूर, दि. 10 :- मेक्सिको सिटी पॅराऑलिंपीक वर्ल्ड चॅम्पीयन स्विमींग स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविलेल्या दिव्यांग कांचनमाला पांडे यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामगिरी निवासस्थानी येथे सत्कार केला. कांचनमाला पांडेच्या पुढील वाटचालीस प्रोत्साहनपर पंधरा लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाईल, तसेच शासनातर्फे सर्वतोपरी सहकार्य केले जाईल असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

कांचनमाला यांनी मेक्सिको मध्ये झालेल्या अंध जलतरणपटूच्या दोनशे मीटर्स पोहण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक पटकाविले आहे. शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी कांचनमाला यांच्या यशाबद्दल माहिती दिली. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते कांचनमाला यांचा शाल, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. कांचनमाला यांच्या जलतरणातील विविध स्पर्धामधील यशाचे तसेच त्यांच्या आत्मविश्वासपुर्ण वाटचालीबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी कौतुकही केले. याप्रसंगी संसदीय कार्यमंत्री गिरीष बापट, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्सव्यवसाय विकास मंत्री महादेव जानकर आदी मान्यवर उपस्थित होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages