आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सोहमला सुवर्ण पदक तर आदिती, सानिया, सान्निला रौप्य पदक - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेत सोहमला सुवर्ण पदक तर आदिती, सानिया, सान्निला रौप्य पदक

Share This

मुंबई । प्रतिनिधी - 
मलेशिया कौलालांपूर येथील चौथ्या आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेत ऑल इंडिया मार्शल आर्ट्स सेल्फ डिफेन्स फेडरेशन इंडिया या संघटनेच्या सोहम कार्लेकर याने सुवर्ण पदक तर आदिती सुरेश पाटील, सानिया काझी आणि सान्नि निवास तिवारी यांनी रौप्य पदक मिळवत भारताचा तिरंगा साता समुद्रापार डौलाने फडकाविला.

मलेशिया कौलालांपूर येथे १ ते ३ डिसेंबर दरम्यान चौथी आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ऑल इंडिया मार्शल आर्ट्स सेल्फ डिफेन्स फेडरेशन इंडिया या संघटनेचे विविध वयो गटातील ३२ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत इतर ४० देशातील १३०० स्पर्धक सहभागी झाले होते. भारतातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करीत आपली छाप आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रस्थापित केली. ऑल मार्शल आर्ट्स सेल्फ डिफेन्स फेडरेशन कराटे संघास निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त जगदीश जाधव, सहायक पोलीस निरीक्षक बी. के. पवार (मुख्य कराटे प्रशिक्षक, महाराष्ट्र पोलीस दल), नागनाथ अक्रम घाटगे, प्रशिक्षक धीरज भीमराव पवार (ब्लॅक बेल्ट ४ डान) व नरेंद्र सुरेश पाटील (ब्लॅक बेल्ट ३ डान) यांचे मार्गदर्शन मिळाल्यामुळे या स्पर्धेत मोठी मजल मारता आली अशी कृतज्ञता संघातील सर्व खेळाडूंनी व्यक्त केली.

खेळाडूंसाठी सरकार कमी पडत आहे - 
भारतीय युवा शक्ती हि भारताचे नाव जगात पुढे घेऊन जात आहे परंतु शासन मात्र आवश्यक त्या सेवा पुरविण्यास कमी पडत असल्याची खंत अदितीचे वडील सुरेश पाटील यांनी व्यक्त केली आहे. सरकारने कराटे खेळणाऱ्या युवा पिढीला न्याय द्यावा अशी मागणी पाटील यांनी केली.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages