राष्ट्रवादी विधान परिषदेतील सभापतीपद, विरोधी पक्षनेतेपद गमावणार ? - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

राष्ट्रवादी विधान परिषदेतील सभापतीपद, विरोधी पक्षनेतेपद गमावणार ?

Share This

मुंबई - काँग्रेसचे माजी जेष्ठ नेते नारायण राणे यांनी आपल्या विधानपरिषद सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्‍त झालेल्या जागेवर पोटनिवडणुकीत भाजपचे प्रसाद लाड विजयी झाल्याने विधान परिषदेतील भाजप आमदारांची संख्या आता १८ झाली आहे. पुढील वर्षी जून आणि जुलै २०१८ मध्ये विधान परिषदेतील २१ जागा रिक्‍त होणार आहेत. सध्याचे संख्याबळ पाहता भाजपची परिषदेमधील संख्या आणखी वाढणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे असलेले सभापतीपद भाजपकडे येणार असून राष्ट्रवादीचे संख्याबळ घटल्याने त्यांच्याकडील विरोधी पक्षनेतेपद काँग्रेसकडे जाणार आहे.

येत्या जून आणि जुलै २०१८ मध्ये विधान परिषदेतील २१ जागा रिक्‍त होत असून त्यात विधानसभा सदस्यातून निवडणून द्यावयाच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४, काँग्रेसच्या ३, भाजपच्या २, शिवसेना आणि शेकापच्या प्रत्येकी एका जागेचा समावेश आहे. विधानसभेत भाजपचे १२२, शिवसेना ६३, काँग्रेस ४२ तर राष्ट्रवादी काँग्रेस ४१ असे पक्षीय बलाबल आहे. या निवडणुकीतील मतांचा कोटा ध्यानात घेतल्यास काँग्रेस दोन तर राष्ट्रवादी काँग्रेसची एक जागा निवडून येईल. गेल्यावेळी काँग्रेसने राष्ट्रवादीला मदत केल्याने त्याची परतफेड म्हणून राष्ट्रवादीकडील अतिरिक्‍त मतांच्या जोरावर दुसरी जागा काँग्रेसला मिळण्याची शक्‍यता आहे. तसेच भाजपच्या तीन तर शिवसेनेच्या पारड्यात एक अशा जास्त जागा पडण्याची शक्‍यता आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages