Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

'बॉम्बे हॉस्पिटल' जवळच्या रस्त्याचे रुंदीकरण अंतिम टप्प्यात


मुंबई । प्रतिनिधी - दक्षिण मुंबईतील सुप्रसिद्ध 'बॉम्बे हॉस्पिटल' लगतच्या सर्व रस्त्यांवर एकेरी वाहतूक असल्यामुळे या रुग्णालयात येणा-या रुग्णांना वा रुग्णवाहिकांना अनेकवेळा चर्चगेट पर्यंत फेरा घालून यावे लागत असे, ज्यामुळे अनेकदा त्यांची गैरसोय होत असे. हे लक्षात घेऊन अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनानुसार आता या 'बॉम्बे हॉस्पिटल लेन'चे रुंदीकरण करण्यात येत आहे. ज्यामुळे सध्या १२.३० मीटर रुंदी असणा-या या रस्त्याची रुंदी आता २१.३४ मीटर एवढी होणार आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या आड येणारी दुकाने यापूर्वीच स्थानांतरीत करण्यात आली आहेत. तर रस्त्याच्या एका बाजूला असणारी व रुंदीकरणात येणा-या विहिरीवर देखील 'स्लॅब' टाकून ती झाकण्यात येणार आहे. तथापि, विहिरीतून पाणी काढण्यासाठी झाकणाची व्यवस्था करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या महिन्यात पूर्ण होऊन या रस्त्यावरुन दुतर्फा वाहतूक सुरु होईल, अशी माहिती 'ए' विभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावकर यांनी दिली आहे.

दक्षिण मुंबईतील मरिन लाईन्स परिसरात 'बॉम्बे हॉस्पिटल ट्रस्ट'चे 'बॉम्बे हॉस्पिटल' हे सुप्रसिद्ध रुग्णालय आहे. देशभरातील रुग्ण या रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येत असतात. हे रुग्णालय 'विठ्ठलदास ठाकरसी मार्ग' (पूर्वीचे अमेरिकन सेंटर असणारा मार्ग) व 'बॉम्बे हॉस्पिटल लेन' या दोन रस्त्यांवर आहे. मात्र या दोन्ही रस्त्यांवर एकेरी वाहतूक (One Way Traffic) असल्यामुळे रुग्णालयात येणा-या रुग्णांना व रुग्णवाहिकांना चर्चगेट पर्यंत फेरा घालून रुग्णालयात यावे लागत असे. 'बॉम्बे हॉस्पिटल लेन' या २०१ मीटर लांबीच्या रुंदीकरणाची 'रस्ता रेषा' (Road Line) सन १९६७ मध्ये आखण्यात आली होती. ज्यामुळे १२.३० मीटर (४० फूट) रुंदीच्या या रस्त्याची रुंदी २१.३४ मीटर (७० फूट) पर्यंत वाढविणे शक्य झाले आहे. 'रस्ता रेषेनुसार रस्त्याच्या रुंदीकरण करण्याच्या कार्यवाहीने आता वेग घेतला आहे. या रस्ता रुंदीकरणाच्या आड येऊ शकणारी ६ दुकाने यापूर्वीच हलविण्यात आली आहे. या रस्त्याच्या एका बाजूला असणारी व रुंदीकरणाच्या आड येऊ शकणा-या विहिरीवर देखील 'स्लॅब' टाकून ती झाकण्यात येणार आहे. तथापि, विहिरीतून पाणी घेता यावे, यासाठी विहिरीच्या एका बाजूला झाकण असणार आहे. ज्यामुळे विहिरीतील पाण्याचा वापर करता येणार आहे. या रस्त्याचे रुंदीकरण करताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला पदपथ आणि रस्त्याच्या मधोमध दुभाजक देखील बांधण्यात येणार आहे. या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम पुढील महिन्यात म्हणजेच मार्च २०१८ मध्ये पूर्ण होईल. त्यानंतर लगेचच या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक सुरु होऊ शकेल. या रस्त्यावर दुतर्फा वाहतूक सुरु झाल्यानंतर 'क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके' चौकातून (मेट्रो चौक) महात्मा गांधी मार्गावरुन उजवे वळण घेऊन 'बॉम्बे हॉस्पिटल लेन' या मार्गाने थेट 'बॉम्बे हॉस्पिटल' मध्ये येणे शक्य होणार आहे. ज्यामुळे रुग्णवाहिकांचा चर्चगेट पर्यंतचा फेरा वाचणार आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom