प्रकल्पबाधितांना संगणक प्रणालीद्वारे पर्यायी घरे - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

प्रकल्पबाधितांना संगणक प्रणालीद्वारे पर्यायी घरे

Share This

प्रकल्पग्रस्तांची नावेही संकेतस्थळावर प्रसिद्ध होणार -
मुंबई । प्रतिनिधी - मुंबईत महापालिकेद्वारे अनेक प्रकल्प उभारले जातात. या प्रकल्पासाठी अनेकांना विस्थापित व्हावे लागते. अशा विस्थापितांना महापालिकेकडून पर्यायी घरे जातात. या पर्यायी घरांचे वितरण आता संगणक प्रणालीद्वारे केले जाणार आहे. संबंधितांची नावे व प्रकल्पाची माहितीही लवकरच संकेतस्थळावर प्रसिध्द केली जाणार आहे. 

रस्त्यांची कामे, पाण्याची पाईपलाईन टाकताना आड येणा-या झोपड्या तोडल्या जातात. यावेळी प्रकल्पबाधितांना दुस-या ठिकाणी नवीन पर्यायी सदनिका दिली जाते. काही प्रकल्पबाधित रहिवाशांकडून सदर सदनिकांची विक्री करून नव्याने पुन्हा दुस-या ठिकाणी नव्याने अनधिकृतपणे झोपड्या उभारून वास्तव्य करतात. त्य़ामुळे विकास कामांना पुन्हा झोपड्यांमुळे अडथळे निर्माण होऊन विकासकामांना खिऴ बसते. त्यामुळे पालिकेने ज्या प्रकल्पबाधितांना पर्यायी सदनिका दिल्या आहेत, त्या व्य़क्तींची नांवे व संबंधित प्रकल्पाची पूर्ण माहिती महापालिकेच्या संकेतस्थऴावर देण्यात यावीत. तसेच सदर सदनिका विकता येणार नाही यासाठी कायद्याने बंदी आणावी अशी ठरावाची सूचना भाजपच्या नगरसेविका मनिषा चौधरी यांनी मांडली होती. यावर प्रकल्पबाधितांना पर्यायी घरांचे वितरण यापुढे लवकरच संगणक प्रणालीद्वारे केली जाणार आहे. य़ाची प्रक्रिया लवकरच कार्यान्वित केली जाणार आहे. शिवाय पर्यायी सदनिका वितरित करताना ताबा मिळाल्यापासून 10 वर्षाच्या कालावधीपूर्वी सदनिकेची विक्री करता येणार नाही अशा अटीचाही अंतर्भाव करण्यात येतो असा अभिप्राय पालिका आयुक्तांनी दिला आहे. सुधार समितीत आलेल्या या प्रस्तावावर प्रशासनाने स्पष्टीकरण दिले. त्यामुळे लवकरच याची अंमलबजावणी केली जाणार आहे. दरम्यान संगणक प्रणालीद्वारे पर्यायी घरांचे वितरण करून संबंधितांची नावेही संकेतस्थऴावर जाहिर केली जाणार असल्याने घरांची होणा-या विक्रीलाही यापुढे चाप लागणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages