
मुंबई | प्रतिनिधी - विविध रोगांचे निदान करण्यासाठी मुंबई महापालिका केईएमच्या पॅथॉलॉजी प्रयोग शाळेत इम्युनो हिस्टो केमिस्ट्री यंत्रणा खरेदी करणार आहे. ट्यूमरस, लिम्फोमा आदी कर्करोगाच्या संबंधित आजारांचे निदान करण्यास यामुऴे मदत होणार आहे. याबाबतचा प्रस्ताव येत्या स्थायी समितीत मंजुरीसाठी येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या केईएम रुग्णालयांत रोज मोठ्या प्रमाणात विविध रुग्ण दाखल होतात. विविध आजारांचे प्रमाणही वाढले आहे. आजारांचे निदान तात्काऴ होण्यासाठी केईएमच्या हिस्टो पॅथॉलॉजि प्रयोगशाळेत स्मॉल राउंड सेल ट्युमर , लिंफोमा आदी रोगांचे निदान करण्यासाठी अँटी बॉडीज इम्युनो हिस्टो केमिस्ट्री या चाचणीसाठी इम्युनो हिस्टो केमिस्ट्री रिएजंट खरेदी करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. पालिका यासाठी 15 लाख 25 हजार रुपये खर्च करणार आहे. मे. बायोजेनिक लाईफ सायन्सेस प्रा. लि. या कंपनीला याचे कंत्राट दिले जाणार आहे. ही यंत्रणा उपलब्ध झाल्यास रुग्णाचे रोग निदान करणे सोपे जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.
