देशाला आदर्श वाटेल असे आपत्ती प्रतिसाद पथक निर्माण करावे - आय.ए.कुंदन - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

देशाला आदर्श वाटेल असे आपत्ती प्रतिसाद पथक निर्माण करावे - आय.ए.कुंदन

Share This

मुंबई । प्रतिनिधी - महाराष्ट्र शासनातर्फे केवळ बृहन्मुंबईकरिता विशेषबाब म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ नूसार आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण मुंबई आणि मुंबई उपनगरे स्थापन करण्यात आले आहे. त्यानुसार बृहन्मुंबई महानगरपालिकेतर्फे मुंबई शहरात पहिल्यांदा आपत्ती प्रतिसाद पथकाची देशात निर्मिती करण्यात आली आहे. हे पथक म्हणजे देशासाठी एक आदर्श पथक असेल असा आशावाद अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय.ए. कुंदन यांनी केला आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागातर्फे शहर आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उदघाटन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) आय.ए.कुंदन यांच्या हस्ते शहर आपत्ती प्रशिक्षण केंद्र, परळ येथे करण्यात आले. यावेळी एफ दक्षिण/एफ उत्तर प्रभाग समितीचे अध्यक्ष सचिन पडवळ, उपायुक्त (आपत्ती व्यवस्थापन) डॉ किशोर श्रीरसागर संचालक (वैद्यकिय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे, मुंबई अग्निशामन दलाचे प्रमुख प्रभात रहांगदळे, सुरक्षा दलाचे प्रमुख दत्तात्रय पाटील, उपप्रमुख समादेशक (एन.डी.आर.एफ) सचिदानंद गावडे, आपत्ती व्यवस्थापनाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांच्यासह शहर आपत्ती प्रतिसाद पथकात सामील होणारे अधिकारी प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

आय.ए.कुंदन शहर आपत्ती प्रतिसाद पथकाच्या उदघाटन प्रसंगी पुढे बोलताना म्हणाल्या की, बृहन्मुंबई महानगरपालिका आपले नागरी दायित्व पार पाडत असताना ते विविध अंगाने काम करत आहे. शहर आपत्ती प्रतिसाद पथक आज देशात पहिल्यांदा मुंबईत साकारत असताना प्रशासने मोठे पाऊल उचलेले आहे. तेव्हा प्रतिसाद पथकातील सदस्याने आपले दायित्व लक्षात घेऊन कर्तव्य पार पाडावे आणि एक देशात सक्षम पथक म्हणून नावाजला यावे अशी अपेक्षा कुंदन यांनी व्यक्त केली. मुंबईतील लोकसंख्या व येथील भौगोलिक रचना लक्षात घेता या पथकाने सातत्याने सर्तक राहणे आवश्यक असल्याचे कुंदन यांनी सांगितले. याप्रसंगी संचालक (वैद्यकिय शिक्षण व प्रमुख रुग्णालये) डॉ. अविनाश सुपे, सुरक्षा दलाचे प्रमुख दत्तात्रय पाटील, उपप्रमुख समादेशक (एन.डी.आर.एफ) सचिदानंद गावडे यांची समयोचित भाषणे झाली. कार्यक्रमाचे प्रास्तविक आपत्ती व्यवस्थापन विभागाचे प्रमुख अधिकारी महेश नार्वेकर यांनी केले तर आभार उपप्रमुख अधिकारी रश्मी लोखंडे यांनी मानले.

शहर आपत्ती प्रतिसाद पथकांविषयी :-
बृहन्मुंबईकरिता विशेषबाब म्हणून राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा २००५ कलम २५ अंतर्गत आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, मुंबई जिल्हा आणि मुंबई उपनगरे स्थापन करण्यात आले आहे. या प्राधिकरणाचे अध्यक्ष महापालिका आयुक्त आहेत. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा कलम ३० (४) अन्वये राष्ट्रीय व राज्य प्राधिकरणाने आखून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांप्रमाणे आपत्ती उभ्दवू नये करिता उपाययोजना, सज्जता आणि प्रतिसाद याकरिता ठोस पाऊले उचलणे या दृष्टीने कार्य करते. या दृष्टीने शहर आपत्ती प्रतिसाद पथक तयार करण्याकरिता सुरक्षा दलातील २०० अधिकारी/जवान, वैद्यकिय अधिकारी, अग्निशमन अधिकारी व आपत्कालीन व्यवस्थापन विभागातील अधिकारी/कर्मचारी यांना प्रशिक्षित केले जाणार आहे. प्रशिक्षणामध्ये ३० महिला व १७० पुरुष सुरक्षा रक्षकांचा समावेश आहे आहे. सर्व सुरक्षा रक्षक २५ ते ३० या वयोगटातील व पदवीधर आहेत. एका महिन्यात एक तुकडीचे प्रशिक्षण पूर्ण करण्यात येणार असून त्यांना खालील प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. रासायनिक, जैविक, अणुनैसर्गिक व आण्विक आपत्तीं हाताळण्याकरिता उपलब्ध करुन देण्यात येणारी यंत्रसामुग्री वापरण्याचे प्रात्यक्षिकांव्दारे प्रशिक्षण दिले जाणार आहे. वैद्यकिय प्रथम प्रतिसाद, कोसळलेल्या बांधकामात अडकलेल्या लोकांचे विमोचन, बचाव नागरी विमोचन व बचाव पाठयक्रम पूराच्या पाण्यातून बचाव सर्व प्रकारच्या नैसर्गिक तथा मानवनिर्मित्त आपत्तींस द्यावयाच्या प्रतिसाद स्तराचे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages