व्यक्तीगत हल्ल्याच्या मर्यादा तुम्ही तोडल्या आता त्याचा शेवट मी करणार - धनंजय मुंडे - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

01 March 2018

व्यक्तीगत हल्ल्याच्या मर्यादा तुम्ही तोडल्या आता त्याचा शेवट मी करणार - धनंजय मुंडे

मुंबई दि. १ - धनंजय मुंडे कधीच कुणाच्या बापाला घाबरला नाही,व्यक्तीगत हल्ल्याच्या मर्यादा तुम्ही तोडल्या आता त्याचा शेवट मी करणार आहे.जनसामान्यांसाठी सुरु असलेल्या या लढाईमध्ये आज मी जिंकलो आहे आणि सरकार हरले आहे. माझी बांधिलकी राज्यातील १२ कोटी जनतेशी आहे त्यामुळे कितीही आरोप झाले तरी मी माझा लढा सुरुच ठेवेन. हवी ती परीक्षा आणि चौकशी करा अशा शब्दात विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी बनावट सीडीप्रकरणी सरकारवर हल्लाबोल केला.

कालपासून न्यूज १८ या वृत्तवाहिनीवर बनावट सीडीप्रकरण गाजत आहे. त्याप्रकरणात विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करण्यात आले.त्यावर आज धनंजय मुंडे यांनी सभागृहात उत्तर दिलेच शिवाय सत्ताधाऱ्यांची बोलतीच बंद केली. धनंजय मुंडे यांनी उत्तर देतानाच सत्ताधाऱ्यांना सज्जड धमही दिला.

न्यूज१८ या वृत्तवाहिनीवर माझ्याबाबतीत बातमी दाखवली गेली. विधीमंडळात दलाली सुरु आहे असा गंभीर आरोप केला गेला.ही गोष्ट विधीमंडळाची बदनामी करणारी आहे.सभागृहाने याविरोधात आवाज उठवला पाहिजे होता.मात्र तसे झाले नाही.अशा खालच्या पातळीचे राजकारण सध्या राज्यात सुरु आहे.याची सुरुवात कुणी केली असेल परंतु याचा शेवट विरोधी म्हणून मी करणार आहे असेही धनंजय मुंडे यांनी स्पष्ट केले.

मी या प्रकरणाच्या खोलात मी गेलो आहे. ती बातमी कुणी सोडली,कशी सोडली,ती व्यक्ती कोण, कोणाला भेटली,हे सर्व मला माहिती आहे.आता यापुढे मी रोज एका मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची बाहेर क्लीप काढणार आहे असा स्पष्ट इशाराही धनंजय मुंडे यांनी दिला.

मी कालपासून माझ्या शासकीय बी४ बंगल्यावर उपलब्ध होतो. मात्र त्या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधीने समोर असतानाही काही प्रतिक्रिया घेतल नाही.एवढया क्षुल्लक कारणावरुन मला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात आहे. मी सरकारमधील मंत्र्यांचे भ्रष्टाचार बाहेर काढले.जर माझ्यावरील आरोप खरे असते तर तुम्ही मला जेलमध्ये टाकले असते.

मी जे काही करतो ते इमानदारीने करतो आणि इमानदारीने काम करुनही माझ्यासोबत असं राजकारण होत असेल तर लोकशाही आहे की नाही याबाबत प्रश्न उपस्थित होतो.या सभागृहातील प्रत्येक मंत्र्याला त्यांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी अडचणीत आणले त्याचा राग असल्यानेच मनात राग धरुन माझ्यावर हे आरोप करण्यात आले असेही धनंजय मुंडे म्हणाले.

मी म्हटल्याप्रमाणे आजपासून भ्रष्टाचार उघड करण्याची सीरीज सुरु करत आहे.ग्रामविकास मंत्र्यांनी पीए २५-१५च्या कामासाठी ५० लाखाची लाच मागितली त्यांच्या संभाषणाची क्लिप सभागृहात दिली आहे.

धनंजय मुंडे, धनंजय गावडे,प्रमोद दळवी,न्यूज१८ या वृत्तवाहिनीच्या संपादकांची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणीही धनंजय मुंडे यांनी केली.

धनंजय मुंडे यांनी आरोपाला उत्तर देताना अनेक मंत्र्यांचे दाखले देत तर काहींची नावे घेत आणि मैत्रीमध्ये असतानाही कशापध्दतीचे राजकारण केले गेले ते सांगत काहींना चांगलेच खडेबोलही सुनावले.

Post Bottom Ad

JPN NEWS