एल्फिन्स्टन पुलासाठी रविवारी 'मेगाब्लॉक' - JPN NEWS

Post Top Ad

JPN NEWS

एल्फिन्स्टन पुलासाठी रविवारी 'मेगाब्लॉक'

Share This
मुंबई । प्रतिनिधी - पश्चिम रेल्वेवरील एल्फिस्टन रोड स्थानकात चेंगरा चेंगरी झाल्याने २३ प्रवाशांचा मृत्यू झाला होता. यानंतर रेल्वे मंत्रालयाने अरुंद पुल असलेल्या ठिकाणी पुलाची रुंदी वाढवण्याचे तसेच काही ठिकाणी नव्याने पूल बांधण्याचे आदेश देण्यात आले. त्याचाच एक भाग म्हणून एल्फिन्स्टन पुलासाठी रविवारी ४ मार्च रोजी ८ तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रविवार रात्री ९.३० वाजता सुरू होणारा हा ब्लॉक सोमवारी पहाटे ५.३० पर्यंत चालणार आहे. या ब्लॉकमुळे या मार्गावर धावणाऱ्या लोकलच्या ३४ फेऱ्या रद्द होणार असून, काही फेऱ्या अन्य मार्गांवर वळवण्यात येणार आहेत. एल्फिन्स्टनच्या या पुलास २०१६ मध्ये संमती मिळाली होती. पण त्याची निविदा २३ सप्टेंबर २०१७ मध्ये काढण्यात आली आहे. त्यानंतर पुलावर झालेल्या चेंगराचेंगरीने पश्चिम रेल्वेस प्रचंड टीकेस सामोरे जावे लागले होते.

Post Bottom Ad

JPN NEWS

Pages