
मुंबई । प्रतिनिधी - महापालिकेचे कार्यक्षेत्र कुलाबापासून तानसा वैतरणा धरणापर्यंत व्यापलेले आहे. महापालिकेच्या विविध आस्थापनांचे जतन व संरक्षण करण्याची महत्वपूर्ण काम महापालिका सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचारी करित असतात. कामाची व्याप्ती लक्षात घेता यापूर्वी महापालिकेकडे “कंमाडो फोर्स” होती. याच धर्तीवर पालिकेची कमांडो फोर्स नव्याने सूरु करण्यासंदर्भात प्रशासन विचाराधीन असल्याचेहीअतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांनी सांगितले.
बृहन्मुंबई महानरगपालिकेच्या सुरक्षा दलाला ५२ वा वर्धापनदिन व पारितोषिक वितरण सभारंभ अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल यांच्या हस्ते सुरक्षा दल प्रशिक्षण केंद्र, भांडुप संकुल, खिंडीपाडा रोड, भांडुप(पश्चिम) येथे संपन्न झाला. या कार्यक्रमास उप आयुक्त (आपत्ती व्यवस्थापन व सुरक्षा) डॉ. किशोर क्षीरसागर, उप आयुक्त (परिमंडळ-६) रणजित ढाकणे, सहाय्यक आयुक्त, खाते प्रमुख तसेच सुरक्षा विभागातील अधिकारी, कर्मचारी व त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते. अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) विजय सिंघल पुढे बोलताना म्हणाले की, महापालिकेच्या सुरक्षा विभागाची व्याप्ती व कर्तव्य लक्षात घेता हा विभाग महापालिकेच्या मालमत्तांचे संरक्षण व सुरक्षितेच्या दृष्टीने महत्वपूर्ण भूमिका पार पाडत असतो. देशाच्या सीमा भागात देशाचे जवान जसे देशाचे संरक्षण करतात, अगदी त्याच पध्दतीने महापालिकेचा सुरक्षा विभाग महापालिकेच्या मालमत्ता व आस्थापनाचे सुरक्षितता करतात. महापालिकेच्या कामाची व्याप्ती लक्षात घेता यापूर्वी महापालिकेकडे “कंमाडो फोर्स” होती. ही फोर्स नव्याने सूरु करण्यासंदर्भात प्रशासन विचाराधीन असल्याचेही सिंघल यांनी सांगितले. सुरक्षा विभागाचे कर्मचारी रुग्णालये, महाविद्यालय, मलनि:सारण प्रकल्प, जलाशय आदींचे संरक्षण करतात. सुरक्षा दलाच्या वर्धापनदिनानिमित्त सुरक्षा दलाच्या कर्मचा-यांनी सादर केलेली प्रात्यक्षिके ही सुरक्षा दलाची दाखवणारे असल्याचे सिंघल यांनी यावेळी नमूद केले. सिंघल यांच्या हस्ते सुरक्षा दलातील अधिकारी व कर्मचारी यांना विविध स्तरावरील पारितोषिक पटकावल्याबदल मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सुरक्षा विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांनी याप्रसंगी विविध प्रात्यक्षिके सादर केली.