समुद्रात फ्लोटिंग रेस्टॉरंट बुडाले - JPN NEWS

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

JPN NEWS

२५ मे २०१८

समुद्रात फ्लोटिंग रेस्टॉरंट बुडाले


१५ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यास यश - 
मुंबई । जेपीएन न्यूज -
वांद्रे- वरळी सी - लिंकजवळ समुद्रात सुरु करण्यात आलेले फ्लोटिंग रेस्टॉरंट शुक्रवारी दुपारी समुद्रात बुडाले. या फ्लोटिंग रेस्टॉरंटवरील १५ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात तेथील स्थानिकांना यश आले आहे. वांद्रे-वरळी सी लिंकजवळ फ्लोटिंग रेस्टॉरंट समुद्रात बुडाल्याची घटना शुक्रवारी दुपारी घडली. या फ्लोटिंग रेस्टॉरंटवरील १५ कामगारांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. या दुर्घटनेत कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती वांद्रेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक पंडित ठाकरे यांनी दिली.

वांद्रे येथील वांद्रे-वरळी सी लिंक समुद्रात या फ्लोटिंग रेस्टॉरंटचे काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन कऱण्यात आले होते. ही खासगी बोट असून ए. आर. के. कंपनीची होती. या फ्लोटिंग रेस्टॉरंटमध्ये १५ कामगार कामाला होते. शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ही क्रूज किनाऱ्यावर उभी असताना भरतीमुळे या बोटीचा अँकर निसटला आणि ही बोट समुद्रात वहात गेली. दरम्यान, बोटीच्या खाली दगड आला. यामुळे बोटीच्या खालच्या भागाचे नुकसान झाले आणि समुद्राचे पाणी आत शिरले. यामुळे ही बोट कलंडल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. वेळीच क्रूजवर अडकलेल्यांच्या मदतीसाठी पोलिस आणि स्थानिक मच्छिमारांनी धाव घेतली. क्रूजवरील १५ जणांना सुखरूप बाहेर काढले. सध्या पाण्यात अधांतरी तरंगत असलेल्या या क्रूजला बोटीनी समुद्राच्या किनारी आणण्याचे काम सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. 

एप्रिल महिन्यात याच बोटीवरील एका कर्मचाऱ्याचे आत्महत्या केली होती. ७ एप्रिलला २३ वर्षीय विनय सिंग राणा नावाच्या एका कर्मचाऱ्याने बोटीवरून समुद्रात उडी मारून आत्महत्या केली. विनयने बोटीवरून उडी मारल्याचे कुणालाही समजले नाही. मात्र, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने हा प्रकार उघड झाला. २४ तासानंतर त्याचा मृतदेह सापडला होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Post Bottom Ad

JPN NEWS