मुंबई - बेस्ट उपक्रमाचा तोटा कमी होण्याऐवजी वाढत चालला आहे. बेस्टमधील बसचा दैनंदिन प्रवासाप्रमाणेच वाहतूक कोंडीसारख्या कारणांनी महसुलात घट होत चालली आहे. २०१७-१८ मध्ये बेस्ट उपक्रमाचा महसूल ११७ कोटी रुपयांनी कमी झाला असून, प्रत्येक बसचा सरासरी प्रवास १७० किमीपर्यंत घसरला आहे. बेस्ट उपक्रमातील परिवहन विभागाचा तिकीट महसूल ११७ कोटी रुपयांपर्यंत घसरला आहे. त्यात प्रत्येक बसचे दररोजचे सरासरी अंतर १७० किमी इतके कमी झाले आहे. यापूर्वी काही कालावधीपर्यंत प्रत्येक बस दररोज सुमारे १८० किमी इतके अंतर कापत होती. मेट्रोच्या कामांप्रमाणेच वाहतुकीचा मंदावलेला वेग त्यासाठी कारणीभूत ठरला आहे. बेस्ट उपक्रमाच्या एकूण महसुलात परिवहन विभागाचा महसूल १,३५९ कोटी रुपये आहे. अशातच बेस्टची प्रवसी संख्या घटून २५ ते २७ लाखांपर्यंत आली आहे. .
Post Top Ad
29 June 2018

बेस्ट उपक्रमाचा तोटा वाढत चालला
'जेपीएन न्यूज' हे मराठी भाषेत प्रसिद्ध होणारे न्यूज पोर्टल आहे. २०१२ - १३ मध्ये जेपीएन न्यूजच्या www.jpnnews.in या डोमेन नावाची (Registered Domain ID: D7956137-IN (Date - 15/12/2013) नोंदणी करण्यात आली आहे. जेपीएन न्यूजची भारत सरकारच्या उद्यम नोंदणी विभागाकडे न्यूज एजंसी म्हणून नोंद आहे.
जेपीएन न्यूजवर राजकारण, केंद्र, राज्य सरकार, सरकारी कार्यालये, स्थानिक स्वराज्य संस्था (महापालिका/ पालिका/ नगर परिषद), पत्रकार परिषदांच्या बातम्या, तसेच इतर ताज्या घडामोडी, विश्लेषणात्मक बातम्या, उपयुक्त माहिती आणि विचारप्रवण करणारे लेख, ब्लॉग यांना प्रसिद्धी दिली जाते.