मुंबई - जुहू चौपाटी परिसरात साफसफाई न केल्याने कंत्राटदाराला भोवले आहे. साफ सफाई न केल्याने संबंधित कंत्राटदाराला पालिकेकडून दंडात्मक कारवाई केली जाणार असल्याची माहिती एका अधिका-याने दिली.
जुहू चौपाटीवर मागील आठवड्यात तीन दिवस साफसफाई केली जात नव्हती. संबंधित कंत्राटदार केवळ वरवरचा कचरा साफ करत असल्याने समुद्रातील कचरा तसाच राहत होता. त्यामुऴे समुद्राला भरती आल्यानंतर हा कचरा किनाऱ्यावर येऊन साचला जायचा. याबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रारी करून पालिकेच्या लक्षात आणून दिल्यानंतर येथील साचलेला कचरा पालिकेने कंत्राटदाराकडून साफ करून घेतला. यावेळी १०० टन कचरा उचलण्यात आल्याची माहिती एका अधिका-याने दिली. दरम्यान साफ सफाई करण्यास हलगर्जी केल्यामुळे प्रशासनाने कंत्राटदारांवर दंडात्मक कारवाई केली आहे.