Breaking Posts

6/trending/recent

Hot Widget

Type Here to Get Search Results !

१ ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद


मुंबई - मुंबईतून जमा होणारा कचरा मुलुंड, कांजूर व देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येतो. येत्या १ ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करण्यात येणार आहे. मुंबईतील कचरा १ ऑक्टोबरनंतर कांजूरमार्ग  व देवनार डम्पिंग ग्राऊंडवर टाकण्यात येईल अशी माहिती घनकचरा विभागाचे उपयुक्त विश्वास शंकरवार यांनी दिली. 

मुंबईची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढते आहे. त्यामुळे मुंबईतून दिवसाला ७,२०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. जमा होणारा कचरा मुलुंड, कांजूर व देवनार डम्पिंगवर टाकला जातो. मुलुंड डम्पिंगची क्षमता संपली आहे. शिवाय पुढील ६ वर्षांकरता पालिकेने सुमारे ७३१ कोटी रुपये खर्च करत मुलुंड डम्पिंग ग्राऊंडवरील कचरा उचलण्याचे कंत्राट फेब्रुवारी २०१८ मध्ये दिले आहे. स्थायी समितीनेही ७३१ कोटी रुपयांच्या कंत्राटाला मंजुरी दिली आहे; परंतु प्रशासनाने येत्या १ ऑक्टोबरपासून मुलुंड डम्पिंग ग्राऊंड बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ७३१ कोटी रुपयांच्या कंत्राटाचे काय करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. देवनार डम्पिंग ग्राऊंडवर अधूनमधून आग लागण्याच्या घटना घडत असून, स्थानिक रहिवाशांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भविष्यात देवनार डम्पिंगही बंद करण्याच्या पालिकेच्या हालचाली सुरू आहेत, तर कांजूर डम्पिंगची कचरा साठवून घेण्याची क्षमता १,५०० मेट्रिक टन इतकी आहे. त्यामुळे कचऱ्याचा प्रश्न पालिकेसमोर कायम आहे.

Top Post Ad

Below Post Ad


Ads Bottom